आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
गुलामीची बाधा
झाली बांधवांना
सत्ता नि पदांना
चटावले

विचार अंगार
विझूनिया गेला
पाठीचा मोडला
ताठ कणा

विचारवैर्‍यांचे
गाती गुणगान
मातीमाय-भान
सुटलेले

सत्तेसाठी सुरू
लाळघोटेपणा
स्वाभिमानी बाणा
विसर्जित

वस्तीवस्तीतून
केले प्रबोधन
मैदान सोडून
दिले आता

पोटार्थीपणाचा
स्वार्थ आड आला
गद्दारीचा झाला
तहनामा

खुर्चीसाठी सुरू
सुमारांची सद्दी
आठवलेव्याधी
फोफावली

निर्लज्ज सोहळा
चार दिवसांचा
जळो लाचारीचा
हंगाम हा!
🚩
      -भरत यादव
   Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने