हास्य

हास्य

हास्य

पापण्या मिटल्या आहेत लोकमंगलाच्या भावनेने
आशिर्वादाच्या मुद्रेत उचलला 
गेलाय हात
आणि ओठांवर स्मितहास्य तरळतेय

तिरस्कार नाही
उपरोध नाही
उपेक्षा नाही
उपहास नाही
कपट तर मुळीच नाही

ही करुणेच्या नदीत तरंगत्या
स्मितहास्याची नाव आहे

तुम्ही हातोडा हाणताय
घण बडवताय
गोळ्या डागताय
तोफा चालविताय
छिन्नविच्छिन्न होतोय देह न् देह
कमळ नयनांचे दलसुद्धा
पार विस्कटुन गेलेय
पण चित्कारच काय
किंचित विव्हळणेदेखील नाही

चिमुकल्या पावलांचा मार
प्रसाद समजणारे 
तेच ते
माऊलीचे
स्मितहास्य

तथागत म्हणाले होते-
माझ्या मृत्यूवर रडू नका
शोक मानू नका, माना आनंद
घृणेला घृणेने नव्हे
प्रेमाने जिंकले जाते.

( ही कविता बामियान विध्वंसावेळी
लिहिली होती )

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

यह कविता बामियान ध्वंस के समय लिखी थी

मुस्कान

पलकें मुंदी हैं लोक मंगल की कामना में
आशीष की मुद्रा में उठा है हाथ
और होंठों पर मुस्कान तैर रही है

हिकारत नहीं
व्यंग्य नहीं
उपेक्षा नहीं
उपहास नहीं
कुटिलता तो हरगिज़ नहीं

यह करुणा की नदी में तैरती
मुस्कान की नाव है

तुम हथौड़े चलाते हो
घण बाते हो
गोलियां दागते हो
तोपें चलाते हो
खंडित होता है अंग अंग
इंदीवर नयनों के दल भी बिखर गए हैं
पर चीत्कार तो क्या
क्षीण कराह तक नहीं

वही
बच्चे के पद प्रहारों को नेमत समझती
मां की मुस्कान

तथागत ने कहा था -
मेरी मृत्यु पर रोना मत
शोक मत मनाना आनंद
घृणा को घृणा से नहीं
प्रेम से जीता जाता है

©विनोद पदरज
Vinod Padraj 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने