राजदंड

राजदंड

राजदंड

हुकूमशहाने आधी
चार भिंतीत कोंडली प्रजा
ठोकून बदडून
पडताळला प्रजेचा मेरुदंड (कणा)

लोकांमध्ये जेव्हा
उरला नाही मेरुदंड
निवडलेले आमचे प्रतिनिधी जेव्हा
स्वतःला घालत सुटले दंडवत
स्वायत्ततेने हात जोडून जेव्हा नशिबाचा स्विकार केला
संविधानाचे खांब जेव्हा गदगदले

जेव्हा एका हुकूमशहाने
राजदंडाची स्थापना करून टाकली

हुकूमशहाचा राजदंड
म्हणजे प्रजेच्या मेरुदंडावर बसलेले
असूडाचे अगणित फटके आहेत

राजदंडाची स्थापना
प्रजेला बाद करण्याचा
यशस्वी हुकूमशाही प्रयोग आहे

जनतेने आता स्वतःला
जनता म्हणवून घेऊ नये
याचक म्हणावे
आणि हुकूमशहाच्या मर्जीला
कायदा समजावे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

राजदण्ड

तानाशाह ने  पहले
चारदिवारी में कैद की प्रजा
ठोक पीट कर 
जांचा प्रजा का मेरुदण्ड (रीढ़)

लोगों में जब
नही बचा मेरुदण्ड 
चुने हुए हमारे प्रतिनिधि जब
खुद से झुकने लगे दण्डवत
स्वायत्तता ने हाथ जोड़कर जब नियति स्वीकार कर ली
संविधान स्तम्भ जब भरभराने लगे

तब एक तानाशाह ने
राजदण्ड की स्थापना कर डाली

तानाशाह का राजदण्ड
प्रजा के मेरुदण्ड  पर पड़े
अनगिनत कौड़े हैं

राजदण्ड की स्थापना
प्रजा को बर्खास्त करने का 
सफल तानाशाही प्रयोग है

जनता अब
खुद को जनता न कहे
याचक कहे
और तानाशाह की मर्जी को
कानून मान ले

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने