आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
निर्लज्जांनी किती
सोडावी ती लाज
सत्तेचा हा माज
अतोनात

जाहले बा सज्ज
आवळण्या गळा
लोकशाहीवेळा
संकटात

वैदिकांनी दिली
हाती धर्मकाठी
लोकशाहीसाठी
घातकच

संविधानापुढे
नाही काही मोठे
कोण हे संघोटे
बांडगुळ

पदाची प्रतिष्ठा
धुळीस मिळवी
बुद्धीस वाळवी
लागली गा

विवेकाची नाही
चाड तीळभर
घाली वारंवार
लोटांगण

सदा सरपटे
धर्मखोर कृमी
मेंदूत गुलामी
भिनलेली

लोकप्रश्नांकडे
करी डोळेझाक
आणि अतिरेक
भावनांचा

संविधानरूपी
विश्वासास तडा
धर्मलंड किडा
वळवळे

सरबराई सुरू
धनदांडग्यांची
गोरगरिबांची
होरपळ

मुस्कटदाबीची
हद्द झाली आता
आंदोलनकर्ता
अपराधी

अत्याचारी गुंड
सत्तेचा लाडका
वृथा छळू नका
लेकीबाळी

धर्माच्या अफूने
झिंगवितो लोका
बाता मारी फुका
विकासाच्या

होई पश्चाताप
आता पदोपदी
दिली सत्तागादी
अडाण्यास!

दुष्ट पुष्यमित्र
येती आणि जाती
दिगंतच किर्ती
भारताची
🚩
      -भरत यादव
    Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने