म्हणतात की तो जातीवंत सुतार होता
जिवंतपणी त्याने
चिक्कार दरवाजे आणि खिडक्या बनविल्या
सुंदर सुंदर नक्षी कोरली सगळ्यांवर
मेल्यावर लाकडे रचली गेली
त्याच्या शरीरावर
मग भडाग्नी देण्यात आला
कायमसाठी
राख करणारा
सहन नाही करू शकला तो
इतके मोठे दुःख
उपजीवीका देणार्या वस्तुने
जाळले जाणे देहाला
काही काळानंतर
पुन्हा जन्मला
प्रायश्चित घेतले झाड बनून
पुन्हा तोडला गेला
बनला दारे आणि खिडक्या
कुणी कुणी तर फांद्या जाळून
स्वयंपाक पण शिजवला
आपल्या अंगाचे शेकडो तुकडे होताना पाहून
मेला नाही तरिही तो
म्हणतात की त्याने बीजामध्ये प्रवेश केला
वाचवित राहिला जंगलांना
आता तो सुतार नव्हे
मूळं पसरविणारा जीव होता!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
बढ़ई
कहते हैं वह खानदानी बढ़ई था
जीते जी उसने
ढेर सारे दरवाजे और खिड़कियां बनाई
सुन्दर-सुन्दर नक्काशी की सभी पर
मरा तो लकड़ियां ढक दी गयी शरीर पर
फिर आग लगा दी गयी
हमेशा के लिए
राख कर देने वाली
बर्दाश्त नहीं कर पाया वह
इतना बड़ा दुख
जीविका चलाने वाली चीज से
जलाये जाना देह को
कुछ समय के बाद
फिर से जन्मा
प्रायश्चित किया पेड़ बनकर
फिर कटा
बना दरवाजे और खिड़कियां
किसी-किसी ने टहनियां सुलगाकर खाना भी पकाया
अपने अंग के सैकड़ों टुकड़े होते देखकर
मरा नहीं फिर भी वह
कहते हैं बीज में प्रवेश कर गया
बचाता रहा जंगलों को
अब वह बढ़ई नहीं
जड़ें फैलाने वाला जीव था!
©नरेश अग्रवाल
Naresh Agarwala