उबुंटू

उबुंटू

'उबुंटू'

'उबुंटू' आफ्रिकेतील एक सर्वांगसुंदर गोष्ट आहे....

वस्तुतः ही आफ्रिकेची एक विशिष्ट संस्कृती म्हणजे 'उबुंटू संस्कृती'शी आपली ओळख करून देते.

एका मानववंशशास्त्रज्ञाने आफ्रिकेतील आदिवासी मुलांना एक खेळ खेळावयास सांगितला...

त्याने मिठाईची एक टोपली एका झाडाजवळ ठेवली.

आणि मुलांना सांगितले की त्यांनी झाडापासून शंभर मीटरच्या अंतरावर उभे राहावे.

मग त्या शास्त्रज्ञाने जाहीर केले की जो ही पळत जाऊन सर्वात आधी झाडाजवळ पोहोचेल,मिठाईची टोपली त्याची होईल.

या नंतर मुलांना हाक मारीत तो म्हणाला,'तयार आहात ना..! आता पळा बरं लवकर..!'

तुम्हाला ठाऊक आहे,
मुलांनी काय केलं ते? 

त्या मुलांनी एकमेंकांचा हात पकडला आणि सोबत मिळून झाडाकडे पळत सुटले.त्यांनी मिठाई परस्परांमध्ये समान वाटून घेतली,आणि भरपूर आनंद साजरा करत ते खाऊ लागले.

जेव्हा शास्त्रज्ञाने त्यांच्याकडून असे करण्याचे कारण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली,

तेव्हा ती मुलं म्हणाली- उबुंटू

ज्याचा अर्थ होता-

'आमच्यातला कुणी एकजणच कसा आनंद साजरा करू शकतो,जोवर बाकीची मुलं दुःखी आहेत?'

त्यांच्या बोलीभाषेत 'उबुंटू' चा अर्थ आहे-
' मी आहे,कारण आम्ही आहोत!'

हा सगळ्या पिढ्यांसाठी एक मोठा संदेश बनू शकतो.

आपल्यातल्या प्रत्येकाचे वागणे असेच असते तर आपण जिथे जाऊ तिथे आनंदाला उधाण आले असते!

आपले जीवनदेखील एक 'उबुंटू' जीवन असते...तर

आपणही म्हणू शकलो असतो...

मी आहे...कारण की आम्ही आहोत!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी मजकूर

"उबुन्टु"

'उबुन्टु' अफ्रीका की एक बेहतरीन कहानी है...

वास्तव में यह अफ्रीका की एक विशिष्ट संस्कृति यानी 'उबुन्टु संस्कृति' से हमारा परिचय कराती है।

एक मानव विज्ञानी ने अफ्रीका के आदिवासी बच्चों से एक खेल खेलने को कहा...

उसने मिठाइयों की एक टोकरी एक पेड़ के पास रख दी

और बच्चों से कहा कि कि वे पेड़ से सौ मीटर दूर खड़े हो जायें।

फिर उस मानव विज्ञानी ने घोषणा की कि जो भी भाग कर सबसे पहले पेड़ के पास पहुंचेगा, मिठाइयों की टोकरी उसकी होगी।

इसके बाद बच्चों को आवाज़ देते हुए उसने कहा, "तैयार...! अब जल्दी से भागो!"...

क्या आप जानते हैं बच्चों ने क्या किया?

उन बच्चों ने एक-दूसरे का हाथ थामा और साथ-साथ पेड़ की तरफ़ दौड़ पड़े। उन्होंने मिठाइयों को आपस में बराबर-बराबर बांट लिया, और ख़ूब आनन्द ले-लेकर खाने लगे।

जब मानव विज्ञानी ने उनसे ऐसा करने का कारण जानना चाहा,

तो उन बच्चों ने कहा– "उबुन्टु।"

जिसका मतलब था–

"हममें से कोई एक भी कैसे खुशी मना सकता है, जब तक कि बाकी बचे लोग दुखी हों?"

उनकी बोली में 'उबुन्टु' का अर्थ है–
"मैं हूं, इसलिये कि हम हैं!"

यह तमाम पीढ़ियों के लिये एक मज़बूत सन्देश हो सकता है।

काश हम में से हर एक का रवैया ऐसा ही होता और हम जहां भी जाते वहां खुशियां बांट सकते!

काश हमारा जीवन भी एक "उबुन्टु" जीवन होता...

काश हम कह सकते...

मैं हूं... इसलिये कि हम हैं!

©राजेश चन्द्र
Rajesh Chandra 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने