नपुंसक

नपुंसक

नपुंसक

आमचे शहर
नपुंसकांचे शहर आहे
जिथे आम्ही रात्रंदिवस
पराक्रम आणि शौर्याची गाणी गात
गर्व आणि साहस यांच्या 
महागाथा ऐकत असतो,
आपल्या महान,पराक्रमी पूर्वजांच्या
बिरूदावलींना आळवीत 
मुक्ती मिळवत असतो,
आमच्या अंतरात्म्याच्या लज्जेपासून.

आम्ही हसू शकतो
ठेच लागून पडलेल्या माणसावर,
आम्ही वाट काढू शकतो ढकलून कुण्या वृद्ध,
कुण्या अपंगाला एका बाजूला,
आम्ही झुंडीच्या रूपात
बेदम बदडून घेऊ शकतो जीव
एखाद्या असहाय्याचा
त्याचा दोष काय आहे हे जाणून न घेताच 
आणि तरिही अभिमानाने 
म्हणू शकतो की 
आमची संस्कृती आहे
'सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय' ची.

आम्ही ढोंग करत असतो
स्त्रियांना पूजण्याचे आणि
त्यांना देवी मानण्याचे
खरेतर प्रत्येक स्त्री आहे आमच्यासाठी 
केवळ एक शरीर
आमच्या बुरसटलेपणाची आणि क्रौर्याची शिकार
असूनही तिच्यामुळेच सुरक्षित आहे आमची अब्रू, 
कारण आमची स्वतःची कसली अब्रू नाहीये, 
आम्ही यातच आनंदी आहोत की 
आमच्या पूर्वजमातांनी 
जोहार केले होते आणि 
त्या सती म्हणून जळून जात होत्या आपल्या दिवंगत पतींच्या चितांवर आणि 
त्यांच्याबरोबरच आमची तमाशा बघणारी संवेदनासुद्धा.

आमच्या सारख्या
शूरांमध्ये
एखाद्या दुर्दैवी दिवशी
( जो नेहमीच असतो )
कुणी लफंगा मारून टाकतो
कुण्या लेकीला
सुर्‍याने भोसकून वीसेकवेळा
चिरडून दगडांनी
आमच्या अस्तित्वावर थुंकणारा 
मारेकरी पुन्हा परततो त्याच ठिकाणी
पुन्हा चिरडतो
त्या मरणासन्न मुलीला
आणि आम्ही उभ्या उभ्या 
सिगारेट पित,
पान मसाला चघळत,
व्हिडियो बनवत,
गप्पा छाटत
फक्त बघत राहात असतो
निरपेक्षपणे,कारण
आम्ही सरळ नाकापुढे चालणारे 
लोक आहोत!

आमच्या लेकीबाळी किंचाळत असतात,
आपला न्याय मिळविण्यासाठी
ऊन्हातान्हात,
पावसापाण्यात,
रस्त्यांवर
त्या लेकीबाळी ज्यांच्याबद्दल अभिमान बाळगण्याच्या मोठमोठ्या बाता मारल्या गेल्या होत्या 
आम्ही विदूषकांनी,
ज्यांच्या सन्मानार्थ अध्याय वाचले होते आम्ही 
आणि जेव्हा त्या लढताहेत स्वसन्मानासाठी
आम्ही त्यांना शिकवीत आहोत
शिस्तीचे धडे, 
दुःशासनांचा बचाव करताना.

जनतेच्या एका प्रतिनिधीने 
उच्चारले होते आप्तवचन
'पोरं आहेत चूक होत असते'
आज पून्हा पुनरुक्ती करतोय दूसरासुद्धा त्याच बोलांची
'युवक अनेकदा भावनेच्या भरात वाहवत जातात'
आम्ही मौनपणे बघत राहातो,
आम्हीच निवडले आहे 
या विदूषकांना,
यांच्यासोबत आमचादेखील 
सर्व सन्मान,
सगळी संवेदना वाहून गेलीय राजकारणाच्या गटारीत आणि 
आम्ही धुंद आहोत
सत्ययुगाच्या प्रतिक्षेच्या नशेत.

एका बाजूला कोलाहल आहे
लोकशाहीच्या खेळाचा आणि
दूसरीकडे पोलिस फरफटत 
आहेत रस्त्यांवर
आपल्या संवैधानिक अधिकारांसाठी
लढत असलेल्या लेकीबाळींना,
आम्ही महान लोकशाही राष्ट्राचे महान मतदार मग्न आहोत धरतीवर अवतीर्ण होत असलेल्या भूतकाळातल्या महानतेला पाहाण्यात,
आम्ही व्यग्र आहोत लोकशाहीच्या प्रांगणात 
राजदंडाला उंचावण्यात.

आम्ही तोंडावर आपटलोय
साष्टांग दंडवताच्या मुद्रेत,
आपल्या 
वैचारिक दळभद्रीपणाच्या ओझ्याने,
आता जेव्हा भिंतीवरती 
लिहिली आहे
आमची दुटप्पीपणाची यशोगाथा,
आम्ही आराम करीत आहोत
आपल्या मसणवटीत
एखाद्या नव्या खेळाच्या प्रतिक्षेत.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

बिना किसी भूमिका के एक कविता :

नपुंसक

हमारा शहर 
नपुंसकों का शहर है  
जहाँ हम दिन रात 
वीरता और शौर्य के गीत गाते
गर्व और साहस की महागाथाएँ सुनते हैं,
अपने महान, प्रतापी पूर्वजों की विरुदावलियाँ दोहराते 
मुक्ति पा लेते हैं 
अपनी अंतरात्मा की लज्जा से।

हम हँस सकते हैं
ठोकर खा कर गिरे आदमी पर 
हम रास्ता बना सकते हैं धकेल कर 
किसी वृद्ध, किसी विकलांग को एक तरफ़,
हम भीड़ की शक्ल में 
पीट पीट कर ले सकते हैं जान 
किसी असहाय की 
बिना जाने उसका दोष 
और फिर भी गर्व से कह सकते हैं 
हमारी संस्कृति है 
‘सर्वजन हिताय, सर्वज़न सुखाय’ की।

हम ढोंग करते हैं 
स्त्रियों की पूजा का और 
उन्हें देवी मानने का
जब कि हर स्त्री है हमारे लिए देह मात्र 
हमारी कुंठा और क्रूरता का शिकार,
बावजूद इसके 
उसी से सुरक्षित है हमारी इज्जत 
क्योंकि हमारी ख़ुद की कोई इज्जत नहीं
हम इसी में खुश हैं कि
हमारी पूर्वजाओं ने जौहर किए थे 
और वे जल जाया करती थीं 
दिवंगत पति की चिता पर 
और उनके साथ ही हमारी तमाशबीन
संवेदना भी।

हम जैसे बहादुरों के बीच 
किसी दुर्भाग्यपूर्ण दिन 
(जो कि अक्सर होता है)
कोई लफ़ंगा मार डालता है
किसी बेटी को 
चाकू घोंप कर बीसियों बार,
कुचल कर पत्थर से 
हमारे अस्तित्व पर थूकता हत्यारा 
फिर लौट कर आता है उसी जगह 
फिर कुचलता है 
उस मृतप्रायः लड़की को 
और हम खड़े सिगरेट पीते, मसाला चबाते, 
वीडियो बनाते, बतियाते 
बस देखते रहते हैं निस्पृह 
हम काम से काम रखने वाले लोग हैं।

हमारी बेटियाँ चीख रही होती हैं 
अपने लिए न्याय पाने को
धूप में, बारिश में, सड़कों पर,
वही बेटियाँ जिन पर गर्व करने की 
बड़ी बड़ी बातें की थी हम विदूषकों ने 
जिनके सम्मान में क़सीदे पढ़े थे हमने,
और जब वे लड़ रही हैं अपने सम्मान हेतु 
हम उन्हें पढ़ा रहे हैं 
अनुशासन का पाठ
दुशासनों का बचाव करते हुए।

जनता के एक प्रतिनिधि ने 
कहे थे आप्तवचन
‘लड़के हैं गलती हो जाती है,’ 
आज फिर दोहराता है दूसरा भी वही बात
‘युवा अक्सर जज्बात में बह जाते हैं’
हम मौन देखते रहते हैं 
हमीं ने चुना है इन जोकरों को
इन्ही के साथ  
हमारा भी सारा सम्मान, सारी संवेदना
बह गई है राजनीति के परनाले में 
और हम धुत हैं 
सतयुग की प्रतीक्षा के नशे में।

एक तरफ़ शोर है 
लोकतंत्र के तमाशे का और 
दूसरी ओर पुलिस घसीट रही सड़कों पर
अपने लोकतांत्रिक अधिकार हेतु 
लड़ रही बेटियों को
हम महान जनतंत्र के महान मतदाता
मगन हैं धरती पर उतरता देखते 
अतीत की महानता को 
हम व्यस्त हैं जनतंत्र के प्रांगण में 
राजदण्ड लहराने में।

हम मुँह के बल गिरे पड़े हैं 
साष्टांग दण्डवत् की मुद्रा में 
अपने वैचारिक दारिद्र्य के बोझ से,
अब जब कि दीवारों पर लिखा है 
हमारे दोगलेपन का यशोगान,
हम आराम कर रहे हैं 
अपनी क़ब्रगाहों में
किसी नये तमाशे की प्रतीक्षा में।

©ShriVilas Singh
श्रीविलास सिंह 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने