मुद्दा आवाज उठविण्याचा नाही
गप्प राहाण्याचा आहे
जर गप्प राहाण्याने
स्वातंत्र्य मिळाले असते तर
हे ही शक्य होते की
दुःख सहोदर नव्हे,निरपेक्ष असते
नेहमी असे घडले आहे की
रडणारे आवाज
एका खोलीत घुसमटत राहिलेत
आणि शेजारचे बंद दार
गहिरे करीत राहिले रडणे
आम्ही युद्धे पाहिली
पण युद्धात कोसळणार्या मृतकांचे डोळे
सदैव विचार करीत राहिले
की कुणी पुढे येऊन
त्या डोळ्यांमधली स्वप्ने चोरून घेईल
मौन पिडीताचे नव्हे
गप्पगुमानांचे डाचते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मसला आवाज़ उठाने का नहीं
चुप रहने का है
गर चुप रहने से
आज़ादी मिलती तो
यह भी संभव होता कि
दुख सहोदर नहीं, निरपेक्ष होता
हमेशा यह हुआ है कि रोने वाली आवाज़ें
एक कमरे में घुटती रही है
और पड़ोस का बंद दरवाज़ा
गहरा करता रहा रूलाई को
हमने युद्ध देखें
लेकिन युद्ध में गिरने वाले मृतकों की ऑंखें
हमेशा सोचती रही
कोई आगे आकर
उन ऑंखों के सपने चुरा लेगा
ख़ामोशी पीड़ित की नहीं
चुप्पियों की चुभती है
©नीलोत्पल उज्जैन
Neelotpal Ujjain