सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग!
🍁
महाराष्ट्र राज्य
पुरोगामी म्हणे
तुणतुणे जुने
करा बंद

धर्म आणि जाती
द्वेषाची साधने
वैराची कारणे
झाली आता

धर्माचा धुरळा
डोक्यात भरला
सरला विरला
बंधूभाव

गावागावातून
प्रचार विषारी
प्रेमाची पांढरी
रक्ताळते

राजरोसपणे
खून पाडताना
वृत्ती संपेचिना
सरंजामी

जाती अभिमान
कधी सोडणार
कधी पाळणार
संविधान

उठवितो कोण
लाभ भांडणाचा
विचार गा याचा
करा जरा

जातीची ही मस्ती
हवीच कशाला
समाज नाशाला
निमंत्रण
🍁
        -भरत यादव
  Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने