स्वातंत्र्याची किंमत

स्वातंत्र्याची किंमत

स्वातंत्र्याची किंमत

जर तू निवडतेस स्वातंत्र्य
तर ते म्हणतात की
तुला याची किंमत मोजावी लागेल.

मी मोजत असते याची किंमत
शिव्यांच्या स्वरुपात!

माझे वडिल मला 
बंडखोर म्हणतात.
माझी आई मला
एक वाह्यात मुलगी म्हणत असते.
समाज मला 
वाया गेलेली पोर ठरवून टाकतो.

माझा माजी प्रियकर मला
गर्विष्ठ कुत्री म्हणतो.

माझी बहिण मला अपयशी म्हणते
आपल्या पतीला खुश ठेवण्यात अपयशी.

माझा देश मला
देशद्रोही म्हणतो.

पण मी,
मी स्वतःला एक स्वतंत्र स्त्री म्हणवून घेते.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

हिंदी अनुवाद
अमिता शिरीन
Amita Sheereen 

आज़ादी की कीमत 

अगर तुम चुनती हो आज़ादी
तो वे कहते हैं के
तुम्हें उसकी क़ीमत अदा करनी होगी.

मैं अदा करती हूं इसकी क़ीमत 
गालियों के रूप में!

मेरे पिता मुझे 
बाग़ी बुलाते हैं.
मेरी मां मुझे
एक खराब लड़की कहती है.
समाज मुझे 
गिरी हुई लड़की क़रार देता है.

मेरा पूर्व प्रेमी मुझे
दंभी कुतिया बोलता है.

मेरी बहन मुझे नाकाम कहती है 
अपने पति को रिझाने में नाकाम.

मेरा देश मुझे 
देशद्रोही कहता है.

लेकिन मैं,
मैं ख़ुद को एक आज़ाद औरत पुकारती हूं!

मूळ इंग्रजी कविता

The Price Of Freedom

If you choose freedom
you have to pay-
they say.

I pay for mine.
I pay in expletives.

My father calls me
rebel
My mother calls me
Bad girl.
The society calls me,
Fallen
And my ex calls me
Arrogant bitch.
My sister calls me a failure
for failing to seduce a husband.
My country calls me
Anti-national.

But I call myself a free woman.

©मौमिता आलम
Moumita Alam 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने