स्मरण-विस्मरण

स्मरण-विस्मरण

स्मरण-विस्मरण

विसरणे फार सोपे आहे
पण स्मरण करणे हा एक संघर्ष होय
जणू खोल विहिरीतून पाणी शेंदणे.

आठवताना अनेकदा चेहर्‍यावर 
दिसून येते वेदना
जसे शेत नांगरताना वर येत असते
मऊ माती

तू जो आज 
आमच्या डोक्यावर बसला आहेस,
आमच्या विस्मरणाचेच तर अपत्य आहेस

आम्ही तर 
विसरूनच गेलो होतो ते गुप्तमार्ग
जे तुझ्या अंधार्‍या कोठारापर्यंत 
जात असत
त्या कोठारापर्यंत 
जिथे दमट आणि कुबट वासात
तू एका हाताने लिहायचा माफीनामा
आणि दूसर्‍या हाताने तयार करायचा विषाच्या गोळ्या
याच कोठारांच्या एका दारामधून बाहेर पडत असत माफीनामे
आणि दूसर्‍या दारातून 
विषाचे पेटार्‍यामागे पेटारे

माफीनामे पोहोचत असत सातासमुद्रापार
आणि विषाचे पेटारे पोहोचायचे शेजारच्या शेतांमध्ये

आम्हाला आमच्या 
मातीच्या सुपीकतेवर 
खूपच भरवसा होता
आम्ही विचार केला की 
हे दोनचार विषाचे पेटारे
मातीचे काय वाकडे करणार आहेत

आणि आम्ही विसरून गेलो...

आम्ही तर माफीनामे आणि 
विषाचे नातेदेखील विसरून 
गेलो होतो
आम्ही तर मानून बसलो होतो की
मनुस्मृती जळून गेलीय
पण आम्ही विसरलो की त्याच 
दमट आणि कुबट वासाने 
भरलेल्या कोठारात
मनुस्मृतीची छपाई कधी थांबलीच नव्हती

आम्हाला वाटले की 
देश संविधानाने चालतो आहे
आम्ही विसरून गेलो की
संविधानाच्या खालीच
हजारो लाखो मनुस्मृती गावागावात
घराघरात फैलावल्यात

आम्ही तर आपल्याच 
स्वप्नात रमून गेलो
आणि 
भगतसिंहाचे स्वप्न विसरून गेलो
आम्ही विसरून गेलो की 
इंग्रजांचे जाणे,
प्रवासाचा केवळ एक टप्पा आहे
आमचे गंतव्य स्थान नव्हे

होय,
विद्रोहींनी अवश्य वेळोवेळी 
आमच्यावर आठवणींचा मारा केला
पण आम्ही त्यांना असे म्हणून नाकारले की 
लोकशाहीत त्यांच्यासाठी कुठले स्थान नाही

आम्ही सत्तेसोबत मिळून 
डाव्याला मंचावरून ढकलून 
खाली पाडले
आणि आम्ही विसरून गेलो की
आता सत्तेकरिता आम्हीच डावे आहोत 
आणि आता ते आम्हाला 
मंचावरून ढकलून देण्याच्या
पूर्ण तयारीत आहेत

ही विसरून जाण्याचीच तर शिक्षा आहे की 
एखाद्या जादूसारखा
तोच माफीनामा आता संविधानात 
बदलला जात आहे
मनुस्मृती आता दिवसाढवळ्या
छापली जात आहे

दमट आणि कुबट कोठारावर
आता भव्य महाल उभा केला जात आहे

कुबट वास तर प्रचंड उठलाय
खरेतर अनेकपटीने अधिक सुटलाय
पण याचा नुसता उच्चार करणेसुद्धा
आता ईश्वरनिंदा ठरते आहे

विस्मरुन दुर्गंधीत पिचणे
अथवा स्मरतास्मरता झुंजत राहाणे...

'मधला (आता) कुठला मार्ग नाही'................

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

भूलना बहुत आसान है
लेकिन याद करना एक संघर्ष है
जैसे गहरे कुएं से पानी निकालना

याद करते हुए अक्सर चेहरे पर उभर आती है पीड़ा
जैसे खेत कोड़ते हुए ऊपर आ जाती है नम मिट्टी 

तुम जो आज हमारे सर पर बैठे हो
हमारे भूल जाने की ही तो औलाद हो

हम तो भूल ही गए थे वे गुप्त मार्ग
जो तुम्हारे अंधेरे तहख़ानों तक जाते थे
उन तहख़ानों तक
जहां सीलन और दुर्गंध में तुम एक हाथ से लिखा करते थे प्रार्थना-पत्र
और दूसरे हाथ से बनाते थे जहर की गोलियां
इन्हीं तहख़ानों के एक द्वार से निकलते थे प्रार्थना-पत्र
और दूसरे से पेटी दर पेटी जहर

प्रार्थना-पत्र पहुंचा करते थे सात समुंदर पार
और जहर की पेटी पहुँचती थी पड़ोस के खेतों में

हमें अपनी मिट्टी की उर्वरा शक्ति पर बहुत भरोसा था
हमने सोचा था कि ये दो चार पेटियां जहर की
मिट्टी का क्या बिगाड़ लेंगी

और हम भूल गए......

हम तो प्रार्थना-पत्र और ज़हर का रिश्ता भी भूल गए थे
हम तो मान चुके थे कि मनुस्मृति जल चुकी है
लेकिन हम भूल गए कि उसी सीलन और दुर्गंध भरे तहखाने में
मनुस्मृति की छपाई कभी रुकी ही नहीं

हमे लगा कि देश संविधान से चल रहा है
हम भूल गए कि ठीक संविधान के नीचे 
हजारों लाखों मनुस्मृतियां गाँव गाँव घर घर पसर चुकी हैं

हम तो अपने ही सपनों में खोये रहे
और भगत सिंह का सपना भूल गए
हम भूल गये कि अंग्रेजों का जाना, सफर का एक पड़ाव भर है
हमारी मंजिल नहीं

हां, विद्रोहियों ने जरूर समय समय पर हम पर 'याद' के गोले दागे
लेकिन हमने उन्हें यह कहकर ख़ारिज कर दिया
कि 'लोकतंत्र' में उनके  लिए कोई जगह नहीं 

हमने सत्ता के साथ मिलकर वाम को मंच से धक्का दे कर गिरा दिया
और हम भूल गए कि अब सत्ता के लिए हम ही 'वाम' हैं
और अब वह हमें मंच से गिराने की पूरी तैयारी में है

यह भूलने की ही तो सजा है
कि किसी 'जादू सा'
वही 'प्रार्थना पत्र' अब 'संविधान' में बदल रहा है
मनुस्मृति अब दिन के उजाले में छप रही है

दुर्गंध युक्त सीलन भरे तहखाने पर 
अब विशाल महल खड़ा किया जा रहा है

दुर्गंध तो अब भी बहुत आ रही है
बल्कि कई गुना ज्यादा आ रही है
लेकिन इसका महज जिक्र करना भी अब 'ईश निंदा' बन चुका है

भूलते हुए दुर्गंध में रहना
या याद करते हुए संघर्ष में रहना....

''बीच का (अब) कोई रास्ता नहीं"...

©मनिष आझाद
Manish Azad 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने