तिरंगा
🇮🇳
१
सकाळचे सात वाजलेत.
बागेतील बाकड्यावर एक गरीब बिनधास्त झोपला आहे.
बागेत फिरायला येणार्या लोकांची ये-जा सुरू आहे.
योगा ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी बसून
हा हा ही ही करताहेत.
आणखी एक ग्रुप सकाळची प्रार्थना घेत आहे,
भारतमातेचा विजय असो,
अधर्माचा नाश होवो,
धर्माचा विजय असो,
सनातनचा विजय असो!
गरीबाला ना हास्यकल्लोळाशी काही देणेघेणे आहे
ना धर्मांच्या विजयाशी.
तो झोपेत आहे.
तिरंगा वाटत फिरत असलेल्यांची
एक टोळी बागेत प्रवेश करते.
एक व्यक्ती गरीबाला हलवून जागे करतो.
ऊठ रे.
७५ वर्षांपासून झोपेतच आहात तुम्ही.
आज स्वातंत्र्यदिन आहे.
गरीब डोळे चोळत चोळत टोळीला पाहातो.
बरं?
स्वातंत्र्यदिन आहे?
...मग मला का उठवले?
....स्वातंत्र्य तुमचे आहे तुम्ही साजरे करा!
आणि गरीब पुन्हा डाराडूर झोपी गेला.
२
दुसरा एक व्यक्ती गरीबाला दमात घेत
म्हणाला,
अरे कुंभकर्णाची अवलाद.
आम्हाला बघून पण झोपलायस!
खूपच अडेलतट्टू आहेस रे तू!
दूसर्याने पहिल्याला इशारा केला,
की असे बोलू नकोस.
गरीब उठून बसला.
घे,तिरंगा घे.
तिरंगा?
काय करू याचे.
अबे,
आपल्या घरी लाव.
घर कुठाय दादा,
मी तर परप्रांतीय मजूर आहे.
घर असते तर बागेत झोपलो असतो का?
ठिकंय,
मग स्वतःजवळ ठेव.
जवळ ठेवल्याने काय होणार,
दादा.
प्रश्न करू नकोस,
वीस रुपये काढ.
दादा,
वीस रूपयेच आहेत खिशात,
काहीतरी खाईन म्हणतो त्यातून
खायचं तर रोजचंच आहे बे.
स्वातंत्र्य रोज रोज येत असते का?
दादा,
स्वातंत्र्य तर रोजच यायला हवे ना?
३
तिसर्या व्यक्तीने दटावले,
वेळ दडवू नका,
याला तिरंगा द्या आणि पुढे निघा.
अजून खूप तिरंगे वाटायचे आहेत.
टोळीने बाकड्यावर तिरंगा
खोचला आणि ते पुढे सरसावले.
गरीबाने हाक दिली,
वो दादा,वो तिरंगेवाले दादा,
काही काम मिळेल का आज?
त्याची हाक कुणीही ऐकली नाही.
गरीबाने शेवटची हाक मारली,
अरे राष्ट्रा,
अरे माझ्या देशा,
कधी गरीबाजवळसुद्धा थोडा वेळ
वाया घालवत चल आपला!
आणि गरीब तिरंग्याला कुठल्याशा
आकांक्षेने बराच वेळ निरखत राहिला.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी लघुकथा
तिरंगा
1
सुबह के सात बजे हैं। पार्क की बेंच पर एक गरीब बेपरवाह सोया है। पार्क में लोग सैर करने आ जा रहे हैं। योगा ग्रुप अलग- अलग स्थानों पर बैठकर हा हा हा कर रहे हैं। एक और ग्रुप सुबह की प्रार्थना करवा रहा है , भारत माता की जय हो, अधर्म का नाश हो, धर्म की विजय हो। सनातन की जय हो।
गरीब को न ठहाकों से कोई सरोकार है न ही धर्मो की विजय से। वह नींद में है।
तिरंगा बांटने वालों का एक झुंड पार्क में प्रवेश करता है। एक व्यक्ति सोए गरीब को ठोकर मार कर जगाता है। उठ जा। 75 बरस से सो ही रहे हो तुम। आज आजादी का दिन है।
गरीब आंख मसलता हुआ झुंड को देखता है। अच्छा? आजादी का दिन है? ... तो मुझे क्यों जगाया...आजादी आपकी है आप मनाओ। और गरीब लम्बी तान कर फिर से सो गया।
2
दूसरे एक व्यक्ति ने गरीब के धौल जमाई, अबे कुंभकर्ण की औलाद। हमे देखकर भी सो गया! बड़ा हेकड़ीबाज है बे तू।
दूसरे आदमी ने पहले को इशारा किया, कि ऐसे मत बोल।
गरीब उठ बैठा।
ले, तिरंगा ले
तिरंगा?
क्या करूंगा इसका
अबे, अपने घर पर लगाओ
घर कहां बाबू, हम तो प्रवासी मजदूर हैं। घर होता तो पार्क में सोते क्या?
अच्छा तो साथ रख अपने
साथ रखने से क्या होगा बाबू जी
सवाल मत कर, बीस रुपिया निकाल
बाबू, बीस रुपिया ही है जेब में, खाना खायेंगे उसका।
खाना तो रोज खाता है बे। आजादी रोज-रोज आती है क्या?
बाबू जी, आजादी तो रोज ही आनी चाहिए न!
3
तीसरे व्यक्ति ने टोका। टाइम खोटी मत कर, इसे तिरंगा दो और आगे निकलो। अभी बहुत तिरंगे देने हैं।
झुंड ने बेंच पर झंडा खोंसा और आगे बढ़ गए।
गरीब ने आवाज लगाई, ओ, ओ बाबू जी, ओ तिरंगे वाले बाबू जी, कुछ काम मिलेगा क्या आज।
किसी ने आवाज नहीं सुनी
गरीब ने अंतिम आवाज लगाई, ओ मुल्क, ओ मेरे मुल्क, कभी गरीब के पास भी थोड़ा वक्त खराब कर लिया करो अपना।
और गरीब तिरंगे को किसी उम्मीद में भर देर तक निहारता रहा।
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia
🇮🇳🇮🇳🇮🇳