शंकराचार्यांना एक पत्र

शंकराचार्यांना एक पत्र

शंकराचार्यांना एक पत्र

मी तर मतीमंद आहे,
आपण जगद्गुरु आहात.
मज मुर्खाला समजावून सांगा की
आपला देव तर हिंदूंना जन्माला घालत असतो,
आणि ख्रिश्चनांचा देव ख्रिस्ती जन्माला घालत असतो,
मुस्लिमांचा देव मुसलमान जन्माला घालत असतो,

मग महाराज,
आपलाच देव सर्वच माणसे का नाही जन्माला घालत?
दूसर्‍या देवांकडून ख्रिश्चन,मुस्लिम का जन्माला घालू देतो?
बौद्ध लोक तर देवाला मानीत नाहीत,
मग यांना कोण जन्म देत असतं?
की आपलाच देव जन्माला घालतो?

गुरु,ब्राह्मण यांना तर देव जन्म देत असतो म्हणे,
पण तोच मग कान्यकुब्ज आणि सर्यूपारिन सुद्धा जन्मास घालतो?
मला देवाची अगाध लीला कळत नाही,
आपणांस कळत असेल तर हे सांगा की एक हिंदू जेव्हा मुसलमान बनतो,तेव्हा त्याचा देव आपल्या आदेशाने बदलतो की मुल्लाच्या?
मुस्लिम हिंदू बनतो तर मग काय खुदा त्याला आपल्या देवाकडे सोपवतो?
हे कसे सोपवतो देवा?

देवा,खूप सारे हिंदू ख्रिश्चन स्त्रियांबरोबर लग्न करताहेत
मग जेव्हा यांना मूल होते तेव्हा त्याला हिंदू देव जन्म देतो की ख्रिस्ती देव?
त्याचा धर्म कुठला देव ठरवत असतो?

जगात जवळजवळ तीनशे वेगवेगळे धर्म आणि पंथ आहेत,
याप्रमाणे तीनशे देव झाले,
या देवांची आपसात भांडणे होत असतील,
एक देव म्हणत असेल-नाही,याला तर मी ख्रिश्चन बनवेन,
प्रभु,या देवांमध्ये मग हाणामार्‍या पण
घडत असतील,
आपण तर पाहिल्या असतील.
कशा असतात त्या हाणामार्‍या?

आणि हे देव आपसात कसल्या शिव्या देत असतात?
आपल्यासारख्या शिव्या हासडतात?
पण देवाला तर आई-बहिण नसतात ना?
मग कुणावरून शिव्या देत असतील बरं?

©हरिशंकर परसाई

मूळ हिंदी 

एक पत्र शंकराचार्य के नाम

मैं तो मतिमंद हूँ, आप जगतगुरु हैं । 

मुझ मूढ़ को समझाइए कि अपना भगवान् तो हिन्दू पैदा करता है, 

और ईसाइयों का भगवान् ईसाई पैदा करता है । 

मुसलमानों का भगवान् मुसलमान पैदा करता है । 

तो प्रभु, अपना भगवान ही सब आदमी पैदा क्यों नहीं कर लेता ? 

दूसरे भगवानों को ईसाई, मुसलमान क्यों पैदा करने देता है ? 

बौद्ध लोग तो भगवान को नहीं मानते । 

फिर इन्हें कौन पैदा करता है ? 

क्या अपना ही भगवान पैदा करता है ? 

गुरु, ब्राह्मण को तो भगवान पैदा करता है, 

पर वही क्या कान्यकुब्ज और सरयूपारीण भी पैदा करता है ? 

मुझे भगवान की लीला समझ में नहीं आती । 

आपको आती होगी तो यह बताइए कि एक हिन्दू जब मुसलमान हो जाता है, 

तब उसका भगवान् आपके हुक्म से बदलता है या मुल्ला के ? 

मुसलमान हिन्दू हो जाता है तो क्या ख़ुदा उसे अपने भगवान् को सौंप देता है । 

यह कैसे सौंप देता है भगवान ? 

भगवान, बहुत से हिन्दू ईसाई स्त्री से शादी करने लगे हैं । 

तो जब इनका बच्चा होता है तब उसे हिन्दू-भगवान् पैदा करता है कि ईसाई का भगवान् ? 

उसकी जाति कौन सा भगवान् तय करता है ? 

दुनिया में लगभग 300 अलग अलग धर्म और पंथ हैं । 

इस तरह 300 भगवान् हो गये । 

इन भगवानों में झगड़ा भी होता होगा । 

एक भगवान कहता होगा -इसे तो मैं हिन्दू पैदा करूँगा । 

दूसरा भगवान् कहता होगा -नहीं, इसे तो मैं ईसाई बनाऊंगा । 

प्रभु, इन भगवानों में फिर मारपीट भी होती होगी । 

आपने तो देखी होगी । 

कैसी होती है वह मारपीट ? 

और ये भगवान आपस में कैसी गालियाँ देते हैं । 

क्या अपने जैसी गालियाँ देते हैं ? 

पर भगवान् की माँ-बहन तो होती नहीं है । 

तो किसकी गाली देते होंगे ?

©हरिशंकर परसाई

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने