आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
उन्मादाचा वारू
सुटला बेफाम
मर्यादा तमाम
ओलांडल्या

धार्मिकतेचा जू
खांद्यावर वाहू
शिजवून खाऊ
विवेकास!

शिक्षणाची गंगा
झाली गा विषारी
शिक्षक पुजारी
बनलेले!

आजचा विद्यार्थी
भक्त कार्यकर्ता
राष्ट्राचा निर्माता
हिंदूमय!

अडाणचोटांची
निघाली वरात
पोचली दारात
पिलावळ!

नागव्या राजाचा
नागवा दरबार
धर्म रस्त्यावर
मांडलेला!

नकट्या मिंद्यांची
खोगीर भरती
माथा रगडती
खुर्चीपुढे!

धर्मलंडांची ही
षंढ राजवट
कोडग्यांची वट
वाढलेली!

पाषाणाचा देव
मिरविती डोई
आणि त्राही-त्राही
माजविती!

जिवंत माणसे
तुडविती पायी
दावणीस गाई
कसाबाच्या!

विद्यापीठ आता
मुक्त नव्हे नमो
प्रतिगामी प्रोमो
प्रचारिती!

भटू पाटलांची
नागपूरी निष्ठा
लाज नि प्रतिष्ठा
घालविली!
🚩
        -भरत यादव
  Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने