दोन
पॅलेस्टाईनला फुगे पाठवा
पॅलेस्टाईनला मदतसाहित्यात
फुगे पाठवा
आणखी काही नाही तुम्ही,
कमीतकमी आपल्या फुप्फुसातली थोडीशी हवा तरी
पाठवूच शकता
ती त्यांच्या रोपट्यांच्या कामी येईल
त्यातून फुलतील फुलं आणि
फुलांमधून पसरेल-दरवळेल सुगंध
मग बारूदगंधामधून त्यांची होईल थोडीफार सुटका,
मिळेल दिलासा
पॅलेस्टाईनच्या मदतसाहित्यात
फुगे पाठवा
इस्पितळांवरती जेव्हा होईल बाॅम्बवर्षाव
फुग्यांना धरुन मुलं निघून जातील
या जगाच्या खूप खूप वरती
जिथे लैलामजनू राहातात
पॅलेस्टाईनला मदतसाहित्यात
भरपूर फुगे पाठवा
जेव्हा इस्त्रायली सैनिक ते फुगे पाहतील
तेव्हा त्या सैनिकांच्या
स्मृतीचेही फुगे फुगतील
मग ते पळत सुटतील आपापल्या
फुगत्या-फुटत्या फुग्यांना
वाचविण्यासाठी.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
फ़िलिस्तीन को गुब्बारे भेजिए.
फ़िलिस्तीन को राहत सामग्री में गुब्बारे भेजिए.
आप और कुछ नहीं, कम से कम,
अपने फेफड़े की थोड़ी सी हवा तो भेज ही सकते हैं.
वह उनके पौधों के काम आएगी.
उनसे खिलेंगे फूल और फूलों से फैलेगी ख़ुशबू.
तो बारूद की गंध से उन्हें मिलेगी थोड़ी राहत.
फ़िलिस्तीन को राहत सामग्री में गुब्बारे भेजिए.
अस्पतालों पर जब भी बरसेंगे बम
गुब्बारों को पकड़ कर बच्चे चले जाएंगे
इस दुनिया से बहुत ऊपर.
जहाँ लैला मजनूँ रहते हैं.
फ़िलिस्तीन को राहत सामग्री में
ढेर सारे गुब्बारे भेजिए.
जब इसराईली सैनिक देखेंगे गुब्बारे
तो उनकी स्मृतियों के गुब्बारे फूलेंगे.
फिर वे भागेंगे अपने अपने
फूलते पिचकते गुब्बारों को बचाने.
©Farid फ़रीद Khan ख़ाँ