शेफाली शाहसाठी

शेफाली शाहसाठी

शेफाली शाहसाठी

जेव्हा झाला तुझा जन्म
कुण्या ज्येष्ठांचे उजळले होते भाग्य!

जसे फुलतात माझ्या बागेत,
आंब्याची सगळी नवी पाने याच ज्येष्ठात

तुला पाहताना मी स्तब्ध होऊन जातो
आणि विचार करतो-
काय तू अभिनयाविनादेखील
डोळ्यांनिशी संवाद करतेस?

कितीतरी अज्ञात जीवांच्या उदास दिवसांचे 
सर्वात सुंदर प्राप्य आहेस तू!

लॅपटाॅपच्या स्क्रीनवर तुला पाहताना
मी ते मूल होऊन जातो
ज्याने 'ट्युलिप'ला पहिल्यांदा पाहिले 
आणि प्रेमात पडला

नक्कीच जर मी कुणी कवी असतो
तर आपली सर्वात सुंदर प्रेमकविता तुझ्यासाठी लिहिली असती पण
आता मी एका खेडेगावात बसलेला
केवळ प्रेक्षक आहे

जाणतेस का शेफाली
तुझ्या सिनेमांशिवाय
इथे आणखीही खूपकाही चालते

काही बायका आहेत-
वृद्धापकाळातल्या आज्या,
ढळत्या वयाच्या काक्या,
ऐन तारुण्यात बनलेल्या अभागी वहिन्या

शुभकाळात 
यांच्या देहावर अशुभ रांगायला लागते
ईश्वर रुष्ट न व्हावा म्हणून
देवापितरांना नैवेद्य दाखविण्याची मनाई आहे

प्रिय शेफाली!
मी जर तुला भेटलो तर
माझी एक विनंती स्विकार
सांग माझ्या मेघास
स्वतःच्या आवाजात एक असत्य

एक स्क्रीप्ट वाचलीयस तू
ज्यात कुठलासा डाॅयलाॅग आहे-
पती म्हणजे दाळभाताचा घास नसतो
जो, पत्नी लग्नाच्या दूसर्‍यादिवशी
गिळायला.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

शेफाली के लिए 

जब हुआ तुम्हारा जन्म
किस जयेष्ठ के खिले थे भाग्य! 

जैसे खिल जाते हैं मेरे बगीचे, 
आम के सारे नये पत्ते इसी जेठ में

तुम्हें निहारते हुए मैं बधिर हो जाता हूँ 
और सोचता हूँ – 
क्या तुम अभिनय के अलावा भी 
आँखों से संवाद करती हो? 

अज्ञात कितने प्राणों के उदास दिनों की 
सबसे सुंदर हासिल हो तुम! 

लैपटॉप की स्क्रीन पर तुम्हें देखते हुए
मैं वो बच्चा हो जाता हूँ 
जिसने “ट्यूलिप” को पहली बार देखा और प्रेम में पड़ गया 

निश्चित ही अगर मैं कोई कवि होता 
तब अपनी सबसे सुंदर प्रेम कविता तुम्हारे लिए लिखता
किंतु अभी मैं एक गांव में बैठा दर्शक मात्र हूँ 

जानती हो शेफाली 
तुम्हारी फिल्मों से इतर 
यहाँ और भी बहुत कुछ चलता है 

कुछ औरतें हैं – बूढ़े समय की दादियाँ,
ढलती उम्र की चाचीयाँ,
भरी जवानी में बन बैठी अभागिन भाभीयाँ 

शुभ समय में
इनकी देह पर अशुभ रेंगने लगता है!
ईश्वर रूष्ठ न हों इसलिए 
देवता-पितरों को भोग चढ़ाने से मनाही है

प्रिय! 
मैं तुमसे अगर मिलूँ 
मेरी एक विनती स्वीकार‌ना
कह देना मेरी मेघा से
अपनी आवाज़ में एक झूठ 

एक स्क्रिप्ट पढ़ी है तुमने
जिसमें कोई डायलॉग है‌ — पति कोई दाल भात का कौर नहीं होता, 
जिसे पत्नी शादी के दूसरे दिन खा‌ जाए।

मनीष यादव 
©Manish Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने