प्रसिद्ध हिंदी कवी पंकज चतुर्वेदी
यांनी अयोध्येतील भव्य मंदिरावर
एक लहानशी कविता लिहिली आणि
ती फेसबुकवर पोस्ट केली.
तर त्यांच्यावर कट्टरतावादी,
सत्ताप्रायोजीत नीच ट्रोलसैन्य
अक्षरशः पिसाळलेल्या कुत्र्यांसारखे
तुटून पडले आहे.एका विवेकी कवीला
धर्मांध मानसिकतेने किडलेल्या
छू-सैन्याकडून
अत्यंत गलिच्छ भाषेत
लक्ष्य केले जात आहे.
त्या कवितेचा मराठीत अनुवाद केल्याने त्याचे
काही घाणेरडे शिंतोडे माझ्यावरही उडणे
साहजिकच होते,आहे.
पण मुख्य मुद्दा आहे संयत आणि
धाडशी मांडणी करणार्या मान्यवर कवीवर
भाडोत्री टोळधाड तुटून पडलेली असताना विवेकवादाचे समर्थन करण्यासाठी समस्त हिंदी साहित्यविश्वातून कुणीच पुढे येण्यास तयार नाही,सन्माननीय अपवाद वगळता!
ही जास्त चिंतेची तसेच संतापाची बाब आहे.
जुलमी हुकूमशाहीच्या क्रूर टाचेखाली सगळ्याचेच सपाटीकरण होत चाललेले असले तरी
पंकज चतुर्वेदी
यांच्यासारखे निवडक कवी अजूनही
आपल्या कवितालेखनातून मुजोर आणि उर्मट सत्तेला आव्हान देत आहेत,विवेकाचा अस्फुट का असेना हुंकार व्यक्त करताहेत ही समाधानाचीच गोष्ट आहे.
हा नीडरपणा इतर भाषिक कवी-लेखकांनीही अनुसरला तर देशातील संवैधानिक मूल्यांची होत
असलेली पायमल्ली काही प्रमाणात तरी रोखली जाऊ शकते अशी आशा वाटते. एकेकाळी
समविचारी पूर्वसुरींनाही अशाच
दिव्यातून जावे लागले होते,
हेच पुढील
टिपणातून पंकज चतुर्वेदी यांनी नमूद केले आहे
जे विवेकाची चाड असणार्या प्रत्येकानेच
वाचायला पाहिजे,
असो.
जिंदाबाद पंकज सर!
--------------------------
प्रसिद्ध लेखक हरिशंकर परसाई यांनी
फार पूर्वी लिहिले होते की,
'या लोकांच्या मेंदूला कुलूप असते आणि
चावी नागपूरच्या मुख्य कार्यालयात जमा असते.'
या व्यंगामुळे बावचळलेल्या अराजकवाद्यांनी त्यांना एकटे गाठून मारहाण केली.एकट्या आणि निःशस्त्र माणसावर हल्ला करणे किंवा त्याचा जीव घेणे - जसा महात्मा गांधींचा स्वतंत्र भारतात खून करण्यात आला होता - हे शौर्य नव्हे,
तर उच्चदर्जाचा पळपूटेपणा,भ्याडपणा आहे.
महत्त्वाचे विधान ते आहे जे
हरिशंकर परसाई यांनी जखमी झाल्यावर केले होते,
ते म्हणाले होते,
"आज माझ्या लेखनाचे सार्थक झाले आहे"
दुसरी मोठी घटना थोर कवी-लेखक गजानन माधव मुक्तिबोध यांच्याबाबत घडली होती. राम आणि कृष्ण यांच्यावरील विश्लेषणात्मक लेखनामुळे त्यांच्या
‘इंडिया: हिस्ट्री अँड कल्चर’ या पुस्तकाच्या प्रती त्यांच्या डोळ्यासमोर जाळण्यात आल्या आणि त्यांच्या घरावर दगडफेक झाली आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचाही कट रचला गेला,जो त्यांच्या राजनांदगाव कॉलेजच्या व्यवस्थापकाने उधळून लावला.
तरिही,
या घटकांच्या दबावामुळे
मध्यप्रदेशच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने
'भारत: इतिहास आणि संस्कृती' या पुस्तकावर बंदी घातली आणि त्याच्या प्रती जप्त केल्या.
मूळात मध्यप्रदेश सरकारच्या औपचारिक विनंतीवरूनच त्यांनी राज्यातील शाळांमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून शिकविण्यासाठी ते लिहिले होते.प्रकाशकाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दीर्घ कायदेशीर लढा दिल्यानंतर ही 'बंदी' उठवता आली आणि न्यायालयाला पुस्तकात काहीही अनुचित आढळले नाही!
आज हे पुस्तक प्रकाशित आणि त्याच्या संपूर्ण आणि अखंड स्वरूपात सहज उपलब्ध आहे, परंतु मुक्तिबोध हा दिवस पाहण्यासाठी जगू शकले नाहीत. पुस्तक आणि परिणामी त्याला मिळालेली भयानक आणि अपमानास्पद वागणूक पाहून ते हादरले. त्या मेहनतीबद्दल त्यांना सरकार किंवा प्रकाशकाकडून कोणतीही रॉयल्टी मिळू शकली नाही, ज्यामुळे त्यांची कर्जातून मुक्तता होऊ शकली असती. आजारपणाव्यतिरिक्त,
वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी त्यांच्या मृत्यूचे कारण देखील जीवनातला हा जीवघेणा संघर्ष असल्याचेही मानले जाते.
...तर स्वतंत्र भारतात हिंदी लेखक आणि कवींना अशी वाईट आणि अमानुष वागणूक दिली गेली, ती सुद्धा तेव्हा हे लोक इतके शक्तीशाली नव्हते.आज तर ते त्यांच्या सत्ताताकदीच्या शिखरावर आहेत, त्यामुळे काही वाईट घडले तर त्यात नवल ते काय?
हे तर एक विशिष्ट प्रकारच्या इतिहासातले
भयावह दृश्य आहे.
मूळ हिंदी टिपण
यशस्वी लेखक हरिशंकर परसाई ने बहुत पहले लिखा था कि 'इन लोगों के दिमाग़ में ताला बंद है और चाबी नागपुर के हेड ऑफ़िस में जमा है।'
इस व्यंग्य से बौखलाकर अराजक तत्त्वों ने उन्हें अकेला पाकर उन पर जानलेवा हमला किया था। अकेले और निहत्थे आदमी पर हमला करना या उस तरह से मार भी डालना--जैसे कि स्वाधीन भारत में महात्मा गांधी की हत्या की गई--कोई बहादुरी नहीं, बल्कि परले दरजे की कायरता है।
महत्त्वपूर्ण वह बयान है, जो हरिशंकर परसाई ने ज़ख़्मी होने के बाद दिया था कि "आज मेरा लेखन सार्थक हो गया।"
दूसरी बड़ी घटना महान कवि-लेखक गजानन माधव मुक्तिबोध के साथ हुई। उनकी किताब 'भारत : इतिहास और संस्कृति' की प्रतियाँ राम और कृष्ण से सम्बन्धित विश्लेषण के कारण उनकी आँखों के सामने जलाई गईं, उनके घर पर पत्थर फेंके गए और उन पर हमले की साज़िश हुई, जिसे उनके राजनाँदगाँव महाविद्यालय के प्रबन्धक ने अपने प्रभाव का इस्तेमाल करके विफल कर दिया था।
इसके बावजूद इन तत्त्वों के असर में आकर मध्यप्रदेश की तत्कालीन कांग्रेस सरकार ने 'भारत : इतिहास और संस्कृति' पर प्रतिबन्ध लगाया और उसकी प्रतियाँ ज़ब्त कर लीं; जबकि उसके ही औपचारिक अनुरोध पर प्रदेश के विद्यालयों में पाठ्य-पुस्तक के रूप में पढ़ाए जाने के लिए उन्होंने उसे लिखा था। मध्यप्रदेश उच्च न्यायालय में प्रकाशक द्वारा लड़ी गई लम्बी क़ानूनी लड़ाई के बाद इस 'बैन' को हटाया जा सका और किताब में कोर्ट ने कुछ भी अनुचित नहीं पाया।
आज यह किताब अपने सम्पूर्ण और अविकल रूप में प्रकाशित और सहज उपलब्ध है, लेकिन मुक्तिबोध यह दिन देखने के लिए जीवित नहीं रह सके। किताब और उसके चलते उनके साथ जो भयावह और अपमानजनक बरताव हुआ, उससे उन्हें सदमा लगा। उस कठिन परिश्रम के लिए उन्हें सरकार या प्रकाशक से कोई रॉयल्टी भी नसीब नहीं हो पाई, जिससे वह अपने क़र्ज़ों से मुक्त हो सकते। महज़ 47 वर्ष की उम्र में उनके देहान्त का कारण बीमारी के अलावा यह कठिन जीवन-संघर्ष भी माना जाता है।
...तो स्वाधीन भारत में हिन्दी के लेखक-कवियों के साथ ऐसा बुरा और अमानवीय सलूक हुआ है, वह भी तब, जब ये लोग इतने ताक़तवर नहीं थे। आज तो ये ताक़त के शीर्ष पर हैं, फिर अगर कुछ बुरा होता है, तो इसमें आश्चर्य की क्या बात है! यह तो एक ख़ास क़िस्म के इतिहास का ख़ौफ़नाक मंज़र है।
©पंकज चतुर्वेदी
Pankaj Chaturvedi