काय फरक पडतो
की राम फळे खात होता की मांस?
काहीच अर्थ नाही याला की
रामाने हरीण कौतुकापोटी मारले की
भोजनासाठी?
मला तर फक्त आठवत राहातो
बसस्टॅंडवरचा बेघर
आणि लंगडा झब्बू-
जो सकाळच्या वेळी तर हात पसरायचा पण
सूर्य मावळला की
कचर्यात उडी मारायचा...
आणि तेव्हा कुठे त्याच्या नशिबी पडायचे दोन घास
म्हणून माझे कवी!
इतिहासतज्ज्ञा!
समीक्षका!- ऐक साल्या,
आपले दुकान बंद कर,
शटर ओढ आणि
एकदा पुन्हा बसस्टॅंड फिरुन ये.
आणि
मग मला सांग
की झब्बू काय खात होता?
फळं की मांस?
आणि हे ही सांग
की तू काय खातोस?
फळ,मांस की झब्बू?
झब्बू-भारतातील कुठल्याही गाव किंवा शहरात आढळणारा पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असलेला सामान्य मनुष्य.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
झब्बू
क्या फ़र्क पड़ता है
कि राम फल खाते थे या माँस?
क्या ही मतलब है कि
राम ने मृग को कौतुक के लिया मारा
या भोजन के लिए?
मुझे तो बस याद आता है
बस-स्टेशन का बेघर और लंगड़ा झब्बू-
जो सुबह-सुबह तो हाथ फैलाता था मगर
सूरज के ढलते ही कचरे में कूद पड़ता था...
और तब जाकर उसे कहीं नसीब होते थे दो निवाले
इसलिए मेरे कवि! इतिहासकार! समीक्षक- सुन साले!
अपनी दुकान बंद कर,
शटर गिरा और
एक बार दुबारा बस-स्टैंड घूम आ।
और
फिर मुझे बताना
कि झब्बू क्या खाता था?
फल या माँस?
और यह भी बताना
कि तुम क्या खाते हो?
फल या माँस या झब्बू?
©अजय दुर्ज्ञेय
श्री अद्वैत