नागवे लोक

नागवे लोक

नागवे लोक

नागवे लोक कुठेही,
कुठल्याही वेळी
नागवे होऊ शकतात
त्यांच्यासाठी कुठल्या हमामाची
( स्नानगृहाची ) गरज नसते
त्यांची लुच्चेगिरी जगजाहीर होत असते.

ते लाख वस्त्रे परिधान करोत
आपल्या स्वभावाने निर्वस्त्र होतात
ते भाषेला निर्वस्त्र आणि 
व्याकरणाला
अश्लिल बनवीत असतात

त्यांना कुणी जाब विचारलाच तर 
ते आक्रमक होतात
उगारू लागतात पंजे

ते कुठल्या टोळीसमाजातून येत नाहीत
ते आपल्यातूनच निघून
दिगंबर होत असतात

ते साधू किंवा कुसाधू नव्हेत
ते मठ वा मंदिरात नाही 
लोकशाहीत राहातात
ते देहाने नव्हे तर 
वर्तणूकीने नागवे असतात

त्यांचे नागवेपण झाकण्याकरिता 
अद्याप
कुठल्या कापडाचा शोध लागलेला नाही.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

नंगे लोग 

नंगे लोग कहीं भी, किसी वक़्त
नंगे हो सकते है
उनके लिए किसी हमाम की ज़रूरत
नहीं होती
उनकी लुच्चई सार्वजनिक होती है

वे लाख वस्त्र पहने
अपने स्वभाव से निर्वसन होते हैं
वे भाषा को निर्वस्त्र और व्याकरण को
अश्लील बना देते हैं

कोई उन्हें टोके तो वे हमलावर
हो जाते हैं
दिखाने लगते हैं पंजे

वे किसी कबीलाई समाज से
नहीं आते
वे हमारे बीच से निकल कर
दिगम्बर हो जाते हैं

वे साधु या कुसाधु नहीं
वे मठ-मन्दिर में नहीं लोकतन्त्र में
रहते हैं
वे देह से नहीं आचरण से नंगे’
होते हैं

उन की नंगई ढकने के लिये अभी तक
किसी वस्त्र का आविष्कार नहीं हुआ है

©स्वप्नील श्रीवास्तव
Swapnil Srivastava 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने