आम्ही
संथ युगातले लोक होतो
संथपणे वाढलो
संथपणे जगलो
संथपणे शिकलो
संथपणे वृद्ध झालो
आम्ही संथ युगातले लोक होतो
खरेतर दिवस आमचेही
बारा तासाचे होते
पण ते संथ व्यतीत होत असत
वर्ष आमचेही
३६५ दिवसांचे होते
परंतू दशकाप्रमाणे जात असत
साठ वर्षे जगायचो आम्ही
परंतू शतकानुशतके जगण्याचा अनुभव गाठीस बांधायचो
आम्ही चालायचो
तर दिवस-दिवस चालत राहायचो
थांबायचो
तर दीर्घ मुक्काम करायचो
आम्हांला
कुठे पोहोचण्याची घाई नसायची
ना परतण्याची
आम्ही क्रिकेटमधल्या,
कसोटी सामन्यांच्या युगातले लोक होतो
संथ गतीच्या बातम्या ऐकत मोठे झालो
मंद आचेवर डाळ शिजताना पाहायचो तासनतास
संथ गतीने पीकं वाढताना बघायचो
संथ पिकलेली फळं-भाज्या खायचो
आंबिल प्यायचो
दूधात भाकरी चुरत
चवीच्या आठवणी आत मुरवायचो
तुटपूंजी साधनसामग्री असलेले लोक होतो आम्ही
कमी वेगाने चालणार्या वाहनांवर
स्वार
आम्ही संथ युगातले लोक होतो
आम्ही खरेतर
कासव युगातले लोक होतो
आम्ही
आतल्या सशाला
कधी उसळी मारू दिले नाही
आम्हाला ठाऊक होते
कूर्मपणा माणसाचा मूळ स्वभाव आहे आणि वेग काल्पनिक
आम्ही कूर्मगतीने जीवन जिंकले
आणि जीवनाची चव अबाधित राखली
आम्ही
संथ युगातले लोक
कुकरच्या शिट्ट्या ऐकतोय आजकाल
ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट पाहातोय
शंभर बातम्या शंभर सेकंदात
पचवत असतो
गतीमान वाहनांवर स्वार
जाण्याआधी परतण्याची वेळ ठरवत असतो
आम्ही संथ युगातले लोक
आयुष्यातला रस शोधतो आहोत
आणि खूप वेगाने धावणारे सशासारखे लोक
आम्हा संथ लोकांवर हसत असतात
आम्ही संथ गतीचे लोक
चालण्यातसुद्धा रसनेची अपेक्षा करायचो
प्रवासात मुक्काम शोधत राहिलो
आणि मुक्कामात जीवन
वेगाने धावणारे लोक म्हणाले
प्रवासात राहू नका
गंतव्यस्थळी पोहोचा
आम्ही वेगाने धावायला लागलो
जगाबरोबर चालण्याच्या प्रयत्नात
आम्ही जे मागे सोडून आलो
ती
जीवनाची रसवंती होती
आम्ही रसविहीन प्रवासात आहोत
बिनचवीचे आयुष्य जगत
रसविहीन आठवणींसाठी
रवाना होण्यासाठी शापित आहोत
जाणतो की
एक दिवस कासवच जिंकणार आहे
आम्ही ससा होण्याच्या स्पर्धेत
धापा टाकत आहोत
ठिबकत आहोत
आम्ही कासवयुगीन लोक
ससा होण्यासाठी शापित आहोत
या दिवसात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
हम धीमे युग के लोग थे
हम
धीमे युग के लोग थे
धीमे बड़े हुए
धीमे जीये
धीमे सीखे
धीमे बूढ़े हुए
हम धीमे युग के लोग थे
हालांकि दिन हमारे भी
12 घण्टे के थे
लेकिन धीमे गुजरते थे
साल हमारे भी
365 दिन के थे
लेकिन दशक जैसे गुजरते
60 बरस जी लेते हम
तो सदियों जीने का अनुभव संजो लेते
हम चलते
तो दिनों चलते रहते
रुकते
तो लंबा पड़ाव डाल देते
हमें
कहीं पहुंचने की जल्दी नही थी
न लौटने की
हम क्रिकेट में, टेस्ट मैच के युग के लोग थे
धीमी गति के समाचार सुनते बड़े हुए
धीमी आंच पर दाल पकते देखते थे घण्टों
धीमी गति से फसलें बढ़ती देखते
धीमे पके फल-सब्जियां खाते
सत्तू पीते
दूध में रोटियां चूरते
जायके की स्मृतियां भीतर ले जाते
कम साधनों वाले लोग थे हम
कम गति से चलने वाले वाहनों पर सवार
हम धीमे युग के लोग थे
हम दरअसल
कछुआ युग के लोग थे
हमने
भीतर के खरगोश को
कभी उछलने नही दिया
हम जानते थे
कछुआ आदमी का असल स्वभाव है
और गति काल्पनिक
हमने कछुआ गति से जीवन जीते
और जीवन मे जायका बनाये रखा
हम
धीमे युग के लोग
कूकर की सीटियां सुनते हैं इनदिनों
ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट देखते हैं
100 समाचार 100 सेकिंड में पचाते हैं
तेज चलते साधनों पर सवार
जाने से पहले लौट आने का समय तय रखते हैं
हम धीमी गति के लोग
जीवन में जायका तलाश रहे हैं
और तेज गति से भागते खरगोश जैसे लोग
हम धीमे लोगों पर हंसते हैं
हम धीमी गति के लोग
चलने में भी जायका चाहते रहे
सफर में पड़ाव ढूंढते रहे
और पड़ाव में जीवन
तेज भागते लोगों ने कहा
सफर में मत रहो
मंजिल पर पंहुचो
हम तेज दौड़ने लगे
जमाने के साथ चलने की कोशिश में
हमने जो पीछे छोड़ दिया
वह
जीवन का जायका था
हम बिना जायके के सफर में हैं
बिना जायके का जीवन जीते
बिना किसी जायके की स्मृतियां लिए
रुखसत होने के लिये अभिशप्त हैं
जानते हैं
जीतना किसी दिन कछुए ने ही है
हम खरगोश होने की दौड़ में
हांफ रहे हैं
रीत रहे हैं
हम कछुआ युग के लोग
खरगोश होने के लिए अभिशप्त हैं इनदिनों।
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia