गांधीजींचा पुतळा

गांधीजींचा पुतळा

गांधीजींचा पुतळा
( दहा कथा )
१.
गांधीजींच्या पुतळ्यावर गोळी झाडली जात होती हे समजून की गोळी पुतळ्याला लागेल पण गोळी गांधीजींना लागली.
पुतळ्यामागून गांधीजी बाहेर आले.गोळी झाडणारे म्हणाले की, गोळी खऱ्या गांधींना लागली ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.पण चिंतेची बाब ही आहे की पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही पुतळ्यावर गोळ्या झाडू तेव्हा पुतळ्यामागून गांधी कसे बाहेर येतील?
गांधी म्हणाले,काळजी करू नका, दरवर्षी तुम्ही पुतळ्यावर गोळ्या झाडा आणि प्रत्येक वर्षी त्या मागून गांधी निघतील.

२.
गांधीजींच्या पुतळ्याला गोळी लागली आणि रक्त वाहू लागले,तेव्हा 
अचानक कर्नल डायर (कर्नल रुसजिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर 1864- 1927) सभेत आला आणि त्याचा चेहरा आनंदाने फुलला.  तो नेमबाजांना इंग्रजीत म्हणाला, शाब्बास... जे आमचे संपूर्ण साम्राज्य करू शकले नाही ते तुम्ही केले आहे.  आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.  तुम्हाला कधी काही काम हवे असेल तर मला कळवा.
उधमसिंह देखील डायरच्या मागे मागेच होते पण त्यांना कोणीही पाहू शकले नाही.

३.
गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्यांना ते काम अधिक प्रामाणिकपणे व्हावे असे वाटले.इतिहास सांगतो की, 
गोळी झाडल्यानंतर गांधीजींनी 'हे राम' म्हटले होते, त्यामुळे गोळी झाडल्याबरोबर गांधीजीच्या पुतळ्याला गोळी लागताच शूटरने आपल्याच एका माणसाला 'हे राम' म्हणायला सांगितले.
हे राम म्हणणारा तयार झाला.
गोळी झाडली गेली, 
ती गांधीजींना लागली, 
रक्त सांडले पण ‘हे राम’ म्हणणाऱ्याला 
‘हे राम’ म्हणता आले नाही.  
तो फक्त 'हे-हे' बडबडत राहिला.

४.
गांधीजींच्या पुतळ्यावर गोळी झाडण्यात आली.पुतळा कोसळला आणि पुतळ्याच्या मागे अनेक लोकांचे मृतदेह पण कोसळलेले दिसले.
त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता ते चंपारण्य येथील शेतकऱ्यांचे मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले.

५.
जेव्हा गांधीजींच्या पुतळ्याला गोळी मारण्यात आली तेव्हा एक आकाशवाणी झाली - 'मूर्खांनो, पुतळा का तोडताय?  
घ्यायचाच असेल तर 
गांधींचा जीव घ्या.
ज्यांनी मारले ते म्हणाले - 
आम्हाला आत्मा काय आहे हे 
माहित नाही.
आकाशवाणी झाली- आत्मा प्रत्येकाच्या आत असतो.  
तुम्ही सुद्धा आत्मा शोधा आणि पहा.
तो म्हणाला- आम्हाला ते समजत नाही.आम्ही शंभर वर्षे झाली तो
शोधत आहोत.

६.
ज्यांनी गांधीपुतळ्याला गोळ्या घातल्या त्यांनी विचार केला की, किती दिवस पुतळ्याला गोळ्या घालणार, ज्यांनी चित्रपट आणि नाटकांमध्ये गांधींच्या भूमिका केल्या आहेत त्यांना का गोळ्या घालू नये?मनात एकच विचार आला की त्यांनी गांधींची भूमिका केलेल्या सर्व कलाकारांना तातडीने पकडावे.
त्यांना सांगण्यात आले की, 
तुम्ही गांधींची भूमिका केली 
म्हणून तुम्हाला गोळ्या घातल्या जातील.
ते म्हणाले ठीक आहे पण ज्याने आपल्याला गोळ्या मारायला तो गोडसे असावा..त्याला फाशी होणार ना?

७.
सुरुवातीला या वादात पडण्याचे धाडस मीडियाला झाले नाही.  याबाबत एका पत्रकाराने वाहिनीच्या मालकाशी चर्चा केली असता,त्यांची खुर्ची फाटली.म्हणजे खुर्चीला छिद्र पडले. 
मालक म्हणाला, 
या छिद्राच्या आत बघ.
त्यात तुम्हाला तुमचे भविष्य दिसेल.पत्रकाराने छिद्रात डोकावले आणि प्रत्यक्षात त्याचे भविष्य पाहिले.
वाहिनीचे मालक म्हणाले,आता तुम्हाला या प्रकरणात काही करायचे असेल तर स्वर्गात जाऊन गांधीजींची मुलाखत घ्या.पत्रकार गांधीजींपर्यंत स्वर्गात पोहोचला.गांधीजी बसून चरखा चालवत होते.पत्रकाराने त्यांना विचारले, महात्माजी, तुमच्या पुतळ्याला गोळी लागली आहे.
तुम्हांला कसे वाटते आहे?
गांधीजी म्हणाले, 
मला खूप बरे वाटते आहे.
पत्रकाराने विचारले, 
का बरे वाटते?
गांधीजी म्हणाले, 
कारण यापूर्वी त्यांनी एका नि:शस्त्र माणसाला गोळ्या घातल्या होत्या.  आणि आता त्यांनी एक पुतळ्याला गोळ्या घातल्या आहेत.  
ज्याच्या हातात शस्त्र असेल त्याला ते कधीच गोळ्या घालणार नाहीत हे त्यांनी सिद्ध केले आहे.

८.
गांधीजींना स्वर्गात सांगण्यात आले की ज्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यांनी त्यांना आपले शत्रू मानले.  गांधीजी म्हणाले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
पत्रकाराने विचारले, महात्माजी तुम्हाला कसे वाटते?
गांधीजी म्हणाले, मला बरे वाटते.
पत्रकाराने विचारले, का?
गांधीजी म्हणाले,
कारण इंग्रजही मला शत्रू मानत होते...माझ्या शत्रूंना मित्र सापडला आहे.

९.
गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्यांना विचारण्यात आले की, तुम्ही गांधीजींना का गोळ्या घालत आहात? ते तर फार पूर्वीच मारले गेलेत.
गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणारे म्हणाले, 
हा भ्रम सर्वांनाच आहे.
 - मग
गांधींना गोळी नक्कीच लागली पण ते मरण पावले नाहीत.
तुम्ही काय बोलत आहात?
आम्ही खरे बोलत आहोत.
मग?
आम्ही सतत मारतो आहोत. 
पण तो मरतच नाही. 
पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा मारू.

१०.
गांधींचा पुतळा बनवणाऱ्याने मोठ्या परिश्रमपूर्वक हा पुतळा बनवला.  पूर्ण पुतळा तयार झाल्यावर त्याने चष्मा लावला.
पुतळ्यावर गोळी झाडणारे भडकले.  ते म्हणाले हा चष्मा काढा.  
गांधींना चष्मा घालायचा नाही.
पुतळा बनवणारा म्हणाला, 
ते तर चष्मा घालायचे.
ते म्हणाले, 
घालायचे आणि हेच तर सर्वात 
वाईट गोष्ट आहे.
चष्म्यात काय वाईट आहे? 
ते तर त्याच्याद्वारे स्पष्टपणे पाहू शकायचे.
होय, पुतळ्याने काहीही स्पष्ट पाहावे असे आम्हाला वाटत नाही. 
चष्मा आमच्याकडे द्या.  
या चष्म्याने मोठी कामे करावी लागतील
कुठली कामे करायची आहेत?
त्याच्या दोन्ही काचा अजून घासायच्या शिल्लक आहेत.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी लघुकथा

गांधी का पुतला
(दस कहानियां)
1.
गांधी के पुतले को यह समझ कर गोली मारी गई थी कि पुतले को मारी जा रही है। लेकिन  गोली गांधी  को लगी।
पुतले के पीछे से गांधी निकल आए। गोली मारने वालों ने कहा यह तो हमारे लिए बहुत खुशी की बात है कि गोली असली गांधी को लगी है । पर चिंता की बात यह है कि अगले साल जब हम पुतले को गोली मारेंगे तो उसके पीछे से गांधी कैसे निकलेगा ।
गांधी ने कहा तुम चिंता मत करो हर साल तुम पुतले को गोली मारना और हर साल  उसके पीछे से गांधी निकलेगा।

2.
गांधीजी के पुतले को जब गोली मारी गई और खून बहने लगा तो अचानक सभा में कर्नल डायर(Colonel Rsginald Edward Harry Dyer 1864- 1927) आ गया उसके चेहरे से खुशी फूटी पडती थी। उसने अंग्रेजी में गोली मारने वालों से कहा, वेल डन ....जो काम हमारा पूरा साम्राज्य नहीं कर सका वह काम तुम लोगों ने कर दिया है। हम तुम्हारे बड़े आभारी हैं। अगर कभी कोई काम हो तो बताना।
डायरके पीछे-पीछे ऊधम सिंह भी आ गए थे पर उन्हें कोई देख नहीं पाया।

3. 
गांधी के पुतले पर गोली चलाने वालों ने सोचा कि उन्हें अधिक प्रामाणिक होना चाहिए। इतिहास बताता है की गोली लगने के बाद गांधी ने 'हे राम' कहा था, इसलिए गोली चलाने वाले ने अपनों में से किसी आदमी से कहा कि गांधी के पुतले पर गोली लगते ही वह  हे राम बोले। हे राम बोलने वाला तैयार हो गया। 
गोली चली, गांधी के लगी, खून बहा लेकिन हे राम कहने वाला, हे राम न बोल सका । वह केवल हे-हे करता रह गया।

4.
गांधी के पुतले पर गोली चली। पुतला गिर गया और देखा गया के पुतले के पीछे तो तमाम लोगों की लाशें पड़ी हैं।
पहचानने की कोशिश की गई तो पता चला कि वे  चम्पारन के किसानों की लाशें हैं।
5.
गांधी के पुतले को जब गोली मारी गयी तब एक देववाणी हुई। आकाश से आवाज आई- अरे मूर्खों पुतले को क्या मार रहे हो। मारना ही है तो गांधी की आत्मा को मारो। 
मारने वालों ने कहा- आत्मा क्या होती है हमें नहीं मालूम।
देववाणी ने कहा- आत्मा तो सबके अंदर होती है। तुम लोग भी आत्मा को खोज कर देखो ।
उन्होंने कहा-  हमें नहीं मिलती। हम सौ साल से खोज रहे हैं।

6.
गांधी को गोली मारने वालों ने सोचा कि पुतले को कब तक गोली मारेंगे क्यों न उन लोगों को गोली मारी जाए जिन्होंने फिल्मों और नाटक में गांधी की भूमिकाएं की हैं । बस यह विचार आना था कि वे आनन-फानन में उन सब अभिनेताओं को पकड़ लाए जिन्होंने गांधी की भूमिका की थी।
उनसे कहा गया, तुम्हें गोली मार दी जाएगी क्योंकि तुम गांधी बने थे।
उन्होंने कहा ठीक है लेकिन हमें गोली मारने वाले गोडसे होंगें न... क्या उन्हें फांसी पर लटकाया जाएगा?

7.
पहले तो मीडिया की  यह हिम्मत ही नहीं पड़ रही थी  कि वह इस विवाद में शामिल हो। जब एक पत्रकार ने  चैनल के मालिक से  इस बारे में बात की  तो मालिक पर  उसकी प्रतिक्रिया  यह हुई  कि उसकी कुर्सी फट गई । मतलब कुर्सी में छेद हो गया।  मालिक ने कहा  इस छेद के अंदर झांक कर देखो।  तुम्हें इसमें अपना भविष्य दिखाई देगा।  पत्रकार ने  छेद में झांका  और वास्तव में उसका भविष्य दिखाई दिया दिया।
चैनल के मालिक ने कहा,  अब तुम अगर  इस मामले में कुछ करना ही चाहते हो  तो स्वर्ग में जाकर  गांधी जी को इंटरव्यू करो। पत्रकार गांधी जी के पास स्वर्ग में जा पहुंचा ।गांधी जी बैठे चरखा कात रहे थे ।उनसे पत्रकार ने पूछा, महात्मा जी आप के पुतले को गोली मारी गई है। आपको कैसा लग रहा है? 
गांधी जी ने कहा, मुझे बड़ा अच्छा लग रहा है।
पत्रकार ने पूछा, अच्छा क्यों लग रहा है?
गांधी जी ने कहा, इसलिए कि पहले उन्होंने एक निहत्थे को गोली मारी थी। और अब उन्होंने एक पुतले को गोली मारी है। उन्होंने यह सिद्ध कर दिया है कि वे उसे गोली कभी नहीं मारेंगे जिसके हाथ में कोई हथियार होगा।

8.
गांधी जी से स्वर्ग में बताया गया कि आपको गोली मारने वाले आपको अपना शत्रु मानते  हैं। गांधी जी ने कहा, इसमें आश्चर्य की कोई बात नहीं।
पत्रकार ने पूछा, आपको कैसा लग रहा है महात्मा जी?
 गांधी जी बोले, मुझे अच्छा लग रहा है।
 पत्रकार ने पूछा, क्यों ?
गांधी ने कहा, इसलिए कि अंग्रेज भी मुझे शत्रु मानते थे... मेरे शत्रुओं को एक मित्र मिल गया है।

9.
गांधी के पुतले  को गोली मारने वालों से पूछा गया कि आप गांधी को गोली क्यों मार रहे हैं? वे तो बहुत पहले मार दिए गए थे।
गांधी के पुतले को मारने वालों ने कहा, सब को यही भ्रम है।
- फिर
- गांधी को गोली तो ज़रूर मारी गयी थी पर वह मरा नही था।
- ये आप क्या कह रहे हैं?
- हम सच कह रहे हैं।
- तो फिर?
- हम लगातार मार रहे हैं।पर वह मरता ही नहीं।अगले साल फिर मारेंगे।

10
गांधी का पुतला बनाने वाले ने बहुत मेहनत से पुतला बनाया। जब पूरा पुतला तैयार हो गया तो उसने पुतले को चश्मा पहना दिया।
पुतले को गोली मारने वाले उत्तेजित हो गए। उन्होंने कहा यह चश्मा उतारो। गांधी को चश्मा नहीं पहनाना है ।
पुतला बनाने वाले ने कहा, वे तो चश्मा पहनते थे ।
उन्होंने कहा, पहनते थे और यही तो सबसे बड़ी बुराई थी। 
- चश्मे से क्या बुराई' उससे तो साफ दिखाई देता है ।
- हां हम नहीं चाहते कि पुतले को कुछ साफ दिखाई दे।चश्मा हमें दे दो। इस चश्मे से बड़े काम लेना हैं।
- क्या काम लेना है?
- इसके दोनों शीशों को घिसना बाकी रह गया है।
................
©असगर वज़ाहत
Asghar Wajahat
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने