रावण अमर आहे

रावण अमर आहे

रावण अमर आहे

रावणाने
अखेरच्या क्षणी
रामाला म्हटले
मी देह नव्हे
वृत्ती आहे
लालसा आहे
हाव आहे
वासना आहे
मी अमर होण्याचा वर मिळवला होता
अमर आहे
शरीराला मार
तू रावणाच्या मरुन जाण्याची कल्पना करु नको
रामाच्या देशात
रामाच्या वेषात
रामाच्या राज्यात
रामाच्या कार्यात
घराघरात
घटाघटात
कणाकणात
मनामनात
राम नव्हे
रावण वसेल

नाव रामाचे असेल
राज्य रावणाचे असेल
राजामध्ये रावण असेल
आणि 
तो राम असल्याचा अभिनय करेल
रावणाच्या अभिनयात इतका जिवंतपणा असेल की 
तो रामापेक्षा
विराट राम दिसेल
आणि रामा...
तू कोनाड्यात पडून
आपल्याच देशात
आपल्याच वेषात
रावणाला राज्य करताना पाहशील

आणि ऐक
तू मला
कधी मारू शकत नाहीस
कारण रावण कुठल्या देहाचे नाव नाही
आतल्या विषादाचे नाव रावण आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

रावण अमर है।

रावण ने
अंतिम समय
श्री राम से कहा
मैं देह नही
वृति हूं
लालसा हूँ
लालच हूँ
हवस हूँ
मैंने अमर होने का वचन लिया था
अमर हूँ
देह को मार
तुम रावण के मर जाने की कल्पना मत करना
राम के देस में
राम के भेस में
राम राज में
राज काज में
घर घर मे
घट घट में
कण कण में
हर मन मे
राम नही
रावण का वास होगा

नाम राम का होगा
राज रावण का होगा
राजा में रावण होगा
और वह राम होने का अभिनय करेगा
रावण के अभिनय में इतनी जीवंतता होगी
कि वह राम से बड़ा राम दिखेगा
और  श्री राम
तुम कोने में पड़े
अपने ही देश में
अपने ही भेष में
रावण को राज करते देखोगे 

और सुनो
तुम मुझे
कभी मार नही सकते
क्योंकि रावण किसी देह का नाम नही
भीतर के विषाद का नाम रावण है। 

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने