🚩
ठासून भरला
ज्ञातीअभिमान
गर्वोन्मत्त जन
दंभखोर!
जातउतरंडीचा
कोण अहंकार
ताठा अपरंपार
श्रेष्ठत्वाचा!
वर्ण आणि जाती
निर्मियेल्या ज्यांनी
आरंभले त्यांनी
शोषणास!
धर्माचे थोतांड
लादले बोकांडी
पुराण चोपडी
थोपलेली!
मंदिराच्या नावे
पिळले प्रचंड
देवाची अखंड
दहशत!
शेंडी-जानव्याचे
काय ते कौतुक
विषमतेचे मुर्ख
प्रदर्शन!
सनातनी आणि
सरंजामी युती
महाअधोगती
समाजाची!
अभिजन आम्ही
ज्ञानसत्ता राखू
बहूजना लेखू
सदा तुच्छ!
🚩
-भरत यादव