आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
बघा महाराष्ट्र
झाला गायपट्टा
भोंदू-बुवा कट्टा
फुललेला!

राज्यकर्ते आता
दिल्लीचे गुलाम
लाज नि शरम
विकलेली!

किळसवाणे हे
षंढ आक्रमण
का मराठीजन
थंड झाले?

गोसावडे-पंड्ये
आळंदीत येती
आम्हां शिकविती
अध्यात्म बा!

मठ्ठ दांडग्यांना
मिळाले आंदण
मराठीचे रान
आयतेच!

घालती थैमान
डुकरांच्या झुंडी
पिकाची नासाडी
करण्यास!

विश्वाचे गा आर्त
जन्म घेई जेथे
तेथे येती जथ्थे
पोटार्थ्यांचे!

ज्ञानोबाच्या दारी
भिकार्‍यांची रांग
संन्याशाचे सोंग
घेऊनिया!

तरी इंद्रायणी
वाहते गुमान
वारकरी प्राण
आले कंठी!

अगा समतेची
मर्‍हाटी संस्कृती
कर्मठ विकृती
हाकलावी!

कोण आहे त्यांचा
बोलाविता धनी
त्यास पैजारांनी
बडवावे!

दगलबाजीचा
मराठ्यांना शाप
फितुरीचे पाप
ठरे पुण्य!
🚩
      -भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने