🚩
भोंदूंची देवळे
मेंदूंची दगडे
बंद गा कवाडे
विवेकाची
रामाचा आहार
ठरवू आपण
त्यावर भांडण
सुरु ठेवू
आव्हाडासुराचा
करा तुम्ही वध
आणि धर्मोन्माद
जिरवावा
सीतात्यागी राम
शंबूकास मारी
अन्यायी मुजोरी
मिरवावी
देवाधर्मासाठी
माणसे मारावी
आणि लपवावी
कारस्थाने
ऐतखाऊंचीच
असावी चलती
कष्टकरी जाती
जीवानिशी
भटभिक्षुकांची
भरावीत पोटे
खर्यालाही खोटे
ठरवावे
भिनली रक्तात
लेखन लबाडी
गाडलेली मढी
उकरती
कुणी मानी सत्य
कुणी काल्पनिक
कवित्व वाल्मिक
ऋषीचे गा
दगडधोंड्यास
देवत्वाचा साज
जिवंत समाज
तिरस्कृत
🚩
-भरत यादव
Bharat Yadav