बिल्कीस बानो,
तुझ्या वयापेक्षाही थोराड झालेय
तुझ्या दुःखाचे वय
आता तू परतून जावू शकत नाहीस २००१ मध्ये
आम्ही पाहिलेय तुझे विस्कटून जाणे
आम्ही ऐकलीय तुझ्या तोंडून
२००२ ची तुझी यातनायात्रा
ही तुझीच नव्हे
समस्त स्त्रियांची अपमानकथा आहे
मानवतेवरची कलंकगाथा आहे
हे सर्व सहन करून जिवंत राहाणे आणि
ते पेलत राहाणे किती
अवघड आहे
कुणी कल्पना करु शकत नाही
मला माहित आहे कसे तुझे
सबंध कुटुंब विखरुन गेले ते
तुला आपला प्रांत सोडावा लागला
कशी नग्न तू डोंगरात,गुहांमध्ये
लपण्यासाठी असहाय झाली
पुनःपून्हा घर बदलत राहिली
मला ठावे आहे कशाप्रकारे तुला
वारंवार घाबरवले,धमकावले गेले
आयुष्यच संपविण्यासाठी
मजबूर केले गेले
कसले दुःख कोसळले असेल तुझ्यावर
जेव्हा तुझे जीवन नरक बनविणार्यांना
तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीबद्दल
बक्षिसी देण्यात आली
पुष्पमालांनी गौरविण्यात आले
बिल्कीस बानो!
मला अभिमान आहे तुझ्या या
अनन्य विजिगिषुवृत्तीचा
मी तुझे दुःख पाहून
पुन्हा पुन्हा पराभूत होत राहिलो
पण तू हरली नाहीस
प्रत्येक अपमानाचा,
प्रत्येक भीतीचा
सामना करत राहिलीस
आयुष्याची इतकी प्रदीर्घ रात्र व्यतीत
केल्यानंतरसुद्धा तू जेव्हा म्हणतेस,
'मला बदला नकोय'
तेव्हा तुझ्या सन्मानार्थ मस्तक झुकते
तू भलेही बचावलीस परंतू
तुझ्या अवतीभवतीच्या अवघ्या
मुला-मुलींचं आयुष्ये बळजबरीने
हिरावून घेतली गेली,
सांग...
कुणाच्या डोळ्यात रक्त नाही उतरणार
असले किळसवाणे,
बीभत्स दृष्य पाहून?
पण तू म्हणतेस की
'त्यांना तुरुंगात डांबले जावे आयुष्यभर,
त्यांचा जीव घेतला जाऊ नये,
त्यांना फाशी देऊ नये'
जे तुला कुठल्याही
पद्धतीने ठार मारू पाहात होते
त्यांच्या जगण्याची कामना करणे सोपे नाहीये....
तुझी वेदना विसरणे अवघड आहे
पण तुझ्या साहसाचा हात धरुन ठेवणे
खूप अवघड नाहीये,
बिल्कीस बानो!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
बिलकिस बानो !
तुम्हारी उम्र से
लम्बी हो गयी है तुम्हारी पीड़ा की उम्र
अब तुम नहीं लौट सकती 2001 में
हमने देखा है तुम्हारा दर-बदर होना
हमने सुनी है तुम्हारी जुबान से 2002 की
तुम्हारी यातना कथा
यह तुम्हारी ही नहीं सारी स्त्रियों की अपमान
कथा है, मानवीयता की कलंक कथा है
यह सब झेलकर जिंदा रहना और
उसे ढोते रहना कितना मुश्किल है,
कोई अनुमान नहीं लगा सकता
मुझे पता है कैसे तुम्हारा
सारा परिवार बिखर गया
तुम्हें अपना देस छोड़ना पड़ा
कैसे नग्न तुम, पहाड़ों में, गुफाओं
में छिपने को मजबूर हुई
बार-बार घर बदलती रही
मुझे पता है किस तरह तुम्हें
लगातार डराया, धमकाया गया
जीवन ही समाप्त करने के लिए
मजबूर किया गया
क्या बीता होगा तुम्हारे ऊपर
जब तुम्हारी जिंदगी नर्क बनाने वालों को
जेल में अच्छे आचरण का उपहार दिया गया
फूल- मालाओं से सम्मानित किया गया
बिलकिस बानो! मुझे गर्व है तुम्हारी
इस अनन्य जीजिविषा पर
मैं तुम्हारा दुख देखकर
बार-बार पराजित होता रहा
लेकिन तुम नहीं हारी
हर अपमान का, हर डर का
सामना करती रही
जिंदगी की इतनी तवील रात गुजारने के बाद
भी जब तुम कहती हो, 'मुझे बदला नहीं चाहिए'
तो तुम्हारे सम्मान में सिर झुक जाता है
तुम भले बच गयी लेकिन
तुम्हारे आस-पास तमाम बच्चों, बच्चियों का
जीवन बलपूर्वक छीन लिया गया
किसकी आंख में खून नहीं उतर
आयेगा यह घिनौना, वीभत्स देखकर
लेकिन तुम कहती हो, 'उन्हें जेल में रखा जाय
जीवन भर, उनकी जान न ली जाय
उन्हें फांसी न दी जाय'
जो तुम्हें किसी भी तरह मार देना चाहते थे
उनके जीवन की कामना आसान नहीं है
तुम्हारा दर्द भुलाना मुश्किल है
लेकिन तुम्हारे साहस का हाथ थामे रहना
बहुत मुश्किल नहीं है बिलकिस बानो!
©सुभाष राय
Subhash Rai