एक राजा होता
त्याने आपल्या राज्यात
तमाम गोष्टींची नावं बदलवली
आता तिथे दिवसाचे नाव
रात्र आहे
कोळशाचे नाव फुल
किंकाळीचे नाव संगीत
भुकेचे नाव भाकर
भीतीचे नाव भक्ती
आणि हुकूमशाहीचे नाव
लोकशाही!
आता त्या राज्यात रात्रीसुद्धा
सूर्य उगवतो!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
कहानी में जनसेवक नाम का एक राजा था
उसने अपने राज्य में
सारी चीज़ों के नाम बदलवा दिये
अब वहां दिन का नाम रात है
कोयले का नाम फूल
चीख का नाम संगीत
भूख का नाम रोटी
भय का नाम भक्ति
और तानाशाही का नाम लोकतंत्र
अब उस राज्य में रात को भी सूरज उगता है
…
(2016 )
©श्रुती कुशवाहा
Shruty Kushwaha