कुणी संपादक आहे
त्याच्याविरुद्ध कसा लिहू
देऊ शकतो,तो नोकरी
हिसकावू पण शकतो
बंद करेल लेख छापणे
थोर नियतकालिकाचा
संपादक आहे कुणी
लेखन छापणार नाही
मोठा लेखक कसा ठरेन
सुप्रसिद्ध समीक्षक आहे,कुणी
साहित्यिक करियर बिघडवू शकतो
कुणी महान प्रकाशक आहे
त्याच्याशी वैर कसे घेऊ
अमर करु शकतो,तोच
कुणाच्या हातात पुरस्कार आहे
त्याच्यावर टीका कशी करु
इतिहासात नोंदला कसा जाईन मग
कुणी परिसंवादात बोलावतो
कुणी चर्चासत्रात
प्रमुख पाहूणा
प्रमुख वक्ता करतात
मंच उपलब्ध करून देतात कुणी
जिथून मोठा दिसतो
कुणी रेडिओ-दूरदर्शनमध्ये
ताकदीची जागा आहे
जो दूरवर पोहोचवतो
तो मार्ग कसा बंद करु
कुणी निव्वळ आपला आहे
त्याला कसा परका करू
चांगली समीक्षा लिहितो कुणी
माझ्या पुस्तकाची
त्याला कसा नाराज करु
कुणी माझ्या संघटनेचा आहे
कसे भाऊ-बंध त्याच्याशी तोडू
कुणाकडे मोठी संघटना आहे
त्याची लोकं नाराज होण्याचा
धोका आहे
कुणी प्रशंसक आहे
त्याला कसा गमावू
एक भीती नाहीये
हजारो भीती आहेत
जगात,
फक्त मोदी-योगीची भीती
थोडीच आहे!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
किस-किस के खिलाफ लिखने से डरता हूँ, मैं
कोई संपादक है
उसके खिलाफ कैसे लिखूं
दे सकता है, वह नौकरी
छीन भी सकता है
बंद कर देगा लेख छापना
महान पत्रिका का संपादक है कोई
रचना नहीं छापेगा
लेखक कैसे बड़ा कहलाऊँगा
नामी-गिरामी आलोचक है, कोई
साहित्यिक कैरियर बिगाड़ सकता है
कोई महान प्रकाशक है
बैर उससे कैसे मोल लूँ
अमर कर सकता है, वही
किसी के हाथ में पुरस्कार है
उसकी आलोचना कैसे करूँ
इतिहास में दर्ज कैसे होउंगा
कोई सेमिनार में बुलाता है
कोई गोष्ठी में
मुख्य अतिथि
मुख्य वक्ता बनाता है
मंच प्रदान करता कोई
जहां से बड़ा दिखता हूँ
कोई रेडियो-दूरदर्शन में ताक़तवर जगह है
जो दूर तक पहुंचाता है
वह रास्ता कैसे बंद करूँ
कोई बिलकुल अपना है
उसे कैसे पराया बनाऊँ
अच्छी समीक्षा लिखता है कोई
मेरी किताब का
उसे कैसे नाराज करूं
कोई मेरे संगठन का है
कैसे भाई -बंदी उससे तोड़ू
किसी के पास बड़ा संगठन है
उसके लोगों के नाराज होने का
खतरा है
कोई प्रशंसक है
उसे कैसे खोऊँ
एक डर नहीं है
हजार डर हैं
जहांन में
सिर्फ मोदी-योगी का डर थोड़े है!
©सिद्धार्थ रामू
Siddharth Ramu