नागव्या राजाला
नागवे म्हणणे गुन्हा असतो.
म्हणून त्याला हटकू नका
कपडे घालण्यास सांगू नका.
फक्त शांतपणे आपले डोळे बंद करा?
आणि स्मरण करा
आभूषणे आणि रेशमीवस्त्रांनी
मढलेल्या राजाचे.
त्या चित्राला खरे मानून घ्या
आणि दवंडी पिटून पिटून
सांगा अख्ख्या राज्याला
कि राजा खूपच सुंदर दिसतो आहे.
मृत्यूला मृत्यू संबोधणे पाप असते.
त्यामुळे त्या बाप मेलेल्या पोरांना
बसवा पलंगावर आणि त्यांना कथा
ऐकवा की
त्यांचा बा कुठेतरी दूर गेला आहे.
येतच असेल.
तोवर लोक हो, तुम्ही जा
आणि खाऊनपिऊन आजपण
झोपी जा.
चूकीला चूक म्हणणे
असुरक्षित असते.
म्हणून बंद करा तुम्ही
आपले कान,
आपले डोळे आणि
आपल्या जिभा
आणि बाहेर निघून जा त्या खोलीमधून
ज्या खोलीत कुण्या पात्र व्यक्तीची जागा कुण्या धनिकाला दिली जात असेल.
रात्री निजताना हे सांगून तुम्ही
स्वतःला क्षमा करा की जगाची
हीच तर रीत असते!
हे सर्वांना स्विकारावे लागते.
आणि मग समाधानाने झोपी जा.
नंतर एक दिवस येईल
जेव्हा तुम्हांला कुणी खाली ढकलेल
तुम्हांला फार मोठी जखम होईल
तुम्ही आजूबाजूला पाहाल
राजा झोपलेला असेल
मुलं जेवत असतील
धनिक हसत असेल
आणि तुम्ही बंधनात असे बांधले जाल की
तुम्ही जखमेला जखम नाही म्हणू शकणार
वेदनेने किंचाळाल तुम्ही
आणि त्यावेळी
तुमचे ऐकणारे कुणी नसेल.
तेव्हा तुम्हाला कळून चुकेल
की नागव्या राजाला नागवे म्हणणे
किती गरजेचे होते!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
नंगे राजा को नंगा कहना
अपराध होता है।
इसीलिए उन्हें मत टोकना
ना ही वस्त्र पहनने को कहना।
बस चुपचाप अपनी आंखें बंद करना
और स्मरण करना
गहनों और रेशमी वस्त्रों से लदे
राजा को।
उस चित्र को सत्य मान लेना
और डंका पीट पीट कर
बताना पूरे राज्य को
कि राजा बेहद ख़ूबसूरत लग रहे हैं।
मृत्यु को,
मृत्यु कहना
पाप होता है।
इसीलिए उस मरे हुए पिता के
बच्चों को बैठाना चौपाई पर
और उन्हें कहानी सुनाना
कि उनके पिता
कहीं दूर गए हुए हैं।
आते ही होंगे।
तब तक तुम लोग जाओ
और खा कर आज भी
सो जाओ।
गलत को गलत कहना
असुरक्षित होता है।
इसीलिए बंद कर लेना तुम अपने
कान, आंख और ज़ुबान
और बाहर चले जाना उस कमरे से
जिस कमरे में किसी योग्य का स्थान
किसी धनी को दिया जा रहा हो।
रात को सोते वक्त
तुम ख़ुद को यह कह कर माफ़ कर देना
कि संसार की यही रीत है।
इसे सभी को स्वीकार करना पड़ता है।
और फिर चैन से सो जाना।
फिर एक दिन आएगा
जब तुम्हें कोई गिराएगा।
तुम्हें बहुत ज़ोर की चोट लगेगी।
तुम अगल बगल देखोगे
राजा सो रहा होगा।
बच्चे खा रहे होंगे।
धनी हॅंस रहा होगा।
और तुम रीतियों में ऐसे बंध जाओगे
कि तुम चोट को चोट नहीं कह पाओगे।
तुम दर्द से चिल्लाओगे
और उस वक़्त तुम्हें कोई नहीं सुन रहा होगा।
तब तुम्हें समझ आएगा कि
नंगे राजा को नंगा कहना
कितना ज़रूरी था।
©आयुष
Ayush