महास्वप्न
इतक्या लवकर संपन्न होणार नाही
हा महायज्ञ
आणखी द्याव्या लागतील असंख्य आहूत्या
आणखी चालवावे लागेल महाअभियान
या पुण्यभूच्या पूर्णशुद्धीसाठी
मिथकांच्या वल्कलातून उठेल
पुरातत्व अवशेषांची वावटळ
एक विराट इतिहास
पृथ्वीचे कपाट फाडून
बाहेर काढला जाईल
जो सर्वाधिक तर्कदृष्टीची आणि
विज्ञानाची दुदुंभी वाजवेल
अहा!
त्या महास्वप्नाची निव्वळ कल्पनादेखील
किती मादक आहे!
या ओबडधोबड महादेशाला
समतल व्हावेच लागेल
किती-किती वेळा
झुकावे लागेल
त्या विराट प्राप्तीपुढे
सर्वांना
एक महास्नान अद्याप चिरप्रतिक्षीत
आहे
ज्याच्या नंतर तो जयघोष दुमदुमेल
दाही दिशांमधून
हाहाःकाराप्रमाणे
त्यावेळेस पावस च्या ऐवजी
अमृत बरसेल
अ मृ त...
आणि तुम्ही आत्तापासूनच आश्चर्यचकित होत आहात
अजून तर तो काळ आलादेखील नाही
फक्त प्रारब्ध आहे हे
परंतू येणार आहेच
आणि तो आम्ही आणू
सर्वांच्या सहकार्याने आणि
प्रचंड बहूमताने.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
महास्वप्न
इतनी जल्दी सम्पन्न नहीं होगा यह महायज्ञ
अभी देनी पड़ेंगी असंख्य आहुतियाँ
अभी चलाना होगा महाभियान
इस पुण्यभूमि की पूर्ण-शुद्धि के लिए
मिथकों के वल्कल से उठेगा
पुरातात्विक अवशेषों का अंधड़
एक विराट इतिहास
पृथ्वी का कपाट फाड़ कर
बाहर निकाला जाएगा
जो सबसे अधिक तर्क और विज्ञान की दुन्दुभि बजाएगा
आह !
उस महास्वप्न की कल्पना भी
कितनी मादक है !
इस उबड़-खाबड़ महादेश को
समतल होना ही पड़ेगा
कई-कई बार
झुकना ही पड़ेगा
उस विराट उपलब्धि के आगे
सबको
एक महास्नान अभी चिर-प्रतीक्षित है
जिसके बाद वह जयघोष गूँजेगा
दसों दिशाओं से
हाहाकार की तरह
उस समय पावस की जगह
अमृत बरसेगा
अ मृ त...
और आप अभी से हलकान हो रहे हैं
जबकि अभी तो वो दौर आया भी नहीं
केवल प्रारब्ध है ये
लेकिन आकर रहेगा
और इसे हम लाएँगे
सबके सहयोग और
प्रचण्ड बहुमत से।
©अदनान कफिल दरवेश
Adnan Kafeel Darwesh