जेव्हा ते मला अटक करायला आले
त्यांनी माझ्या घराची झडती घेतली
आणि
आमच्या वाचन करण्याच्या टेबलाचीही.
त्यांनी तपासले आमचे कपाट
झडती घेतली कपड्यांच्या कपाटाची
उलटे-सुलटे केले सगळे कपडे
भिंतींना खोदून टाकले.
कागदं जाळून टाकली.
फ्रीजमध्ये शोधलं त्यांनी
गोमांस.
परंतू ते त्या
बहूमुल्य गाठोड्याची झडती घेणे विसरले.
त्यांना ठाऊक नाही की
कवी आपली शस्त्रं
आपल्या स्मृतीत सांभाळून ठेवतात.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
गिरफ्तार करने वालों के नाम
जब वे मुझे गिरफ्तार करने को आए
उन्होंने हमारे घर की तलाशी ली
और
हमारी पढ़ने की मेज की भी.
उन्होंने खंगाली हमारी अलमारी
ली तलाशी कपड़े की अलमारी की,
उलट- पलट दिए कपड़े सारे.
दीवारों को खोद डाला.
कागज़ों को जला डाला.
फ्रिज में तलाशा उन्होंने
गोमांस.
लेकिन वे उस
कीमती पोटली की तलाशी लेना भूल गए.
उन्हें नहीं मालूम के
कवि अपने हथियार
अपनी स्मृतियों में संजोते हैं.
हिंदी अनुवाद
अमिता शिरीन
Amita Sheereen
मूळ इंग्रजी कविता
Those Who Came To Arrest Me
When they came to arrest me
They searched my home
and the reading table.
They searched the almirah
searched the wardrobe
they ransacked the clothes
they dig up the wall
They burn the papers
They searched for beef
in the refrigerators.
But they forgot to search the precious vault:
they don't know
the poets store the weapons in their memories.
©मौमिता आलम
Moumita Alam