बुद्ध झाकले जातच नाहीत

बुद्ध झाकले जातच नाहीत

बुद्ध झाकले जातच नाहीत!

किती धडपड केली गेली असेल
केसरियाच्या या महास्तूपाला
झाकण्याची
पूरेपूर प्रयत्न झालाय लपविण्याचा
एका जिवंत इतिहासाला.

खरेतर झाकले नाही गेले याला
आपल्या कुकृत्याला लपवले होते
त्यांनी
विविध मुद्रांमध्ये बसलेल्या
तथागत बुद्धांच्या मुर्तींच्या
मस्तकांना केले गेले छिन्नविच्छिन्न,
यावरुन
अपार घृणेची कल्पना करु शकता!

तोडली गेली बोटे
धम्मचक्र मुद्रेत बसलेल्या बुद्धांची
ध्यानमुद्रेत बसलेल्या बुद्धांचे दोन्ही हात 
तोडून वेगळे केले गेले
भूमीस्पर्शमुद्रेत बसलेल्या तथागतांच्या उजव्या हाताला बाहूपासून वेगळे केले गेले
वरदमुद्रेत बसलेल्या बुद्धांचा उजवा हात तोडला
मग करणमुद्रेतल्या बुद्धांच्या अंगठ्याला तोडले गेले.
किती भ्याले होते ते लोक.

वज्रमुद्रेतील बुद्धांच्या उजव्या हाताच्या मूठीस डाव्या हातापासून वेगळे केले गेले
वितर्कमुद्रेतील बुद्धांची तर्जनी 
आणि अंगठा दिसू नये 
म्हणून तोडले गेले त्यांच्या हातांना

अंजली,उत्तरबोधी वा अभयमुद्रेत स्थानापन्न असलेल्या तथागतांच्या हातांना शरीरापासून वेगळे केले गेले
प्रत्येक मुर्तीच्या डोक्यावर केले गेले प्रहार
दिसतेय घृणा तुमची
बुद्धांच्या पुतळ्यांविषयीची
तरीही तुम्ही आपल्या संस्कृतीला
सहिष्णु असल्याचे सांगताना थकत नसता.

जगातला सर्वात उंच
केसरियाचा हा स्तूप
चित्कार करीत सांगतो आहे
या अवस्थेमध्ये कुणी पोहोचवले
त्याला

बुद्धांनी व्यतीत केला इथे फक्त एक दिवस,आपल्या महापरिनिर्वाणापूर्वी.
अशोकाने स्मृती जिवंत केली स्तूपात,
पण कुणी याला उद्धवस्त केले?

तेव्हा ना कुठले मोगल होते
ना कुठले तालिबान होते
ना जनरल डायर होता
तरिही असे का झाले असेल?
कसे आणि कुणी सांगितले हा
राजा बेनचा किल्ला आहे म्हणून?

कितीही करा प्रयत्न
बुद्धांना झाकण्याची
बुद्धांना लपवण्याची
पण 
बुद्ध झाकले जातच नाहीत!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

बुद्ध हैं कि ढकते नहीं
- संतोष पटेल

कितनी मेहनत की गई होगी
इसको ढकने में
केसरिया के महास्तूप को 
मानो छुपाने की पूरी कोशिश हुई
एक जीवंत इतिहास को।

दरअसल ढका नहीं गया इसे
अपने कुकृत्य को छुपाया था
उन्होंने 
विभिन्न मुद्राओं में बैठे बुद्ध के 
मूर्तियों के सिर को 
किया गया क्षत विक्षत 
नफरत का अंदाजा लगा सकते हो!

तोड़ दी गई ऊंगलिया धर्म चक्र मुद्रा 
बैठे बुद्ध की
ध्यान मुद्रा में बैठे बुद्ध के दोनों हाथ तोड़ कर 
अलग किया गया
भूमि स्पर्श मुद्रा में बैठे बुद्ध के दाहिने हाथ को 
बांहों से अलग कर दिया गया
वरद मुद्रा में बैठे बुद्ध के दाहिने हाथ को तोड़े
फिर करण मुद्रा में बैठे बुद्ध को 
अंगूठे को तोड़ा गया।
कितने डर गए थे वे लोग।

वज्र मुद्रा में बैठे बुद्ध के दाहिने हाथ की मुट्ठी को 
बाएं हाथ से विलग किया गया 
वितर्क मुद्रा की नहीं दिखे तर्जनी और 
अंगूठा बुद्ध की
तोड़ डाले गए। उनके हाथों को।

अंजलि, उत्तर बोधि या अभय मुद्रा में बैठे 
बुद्ध को हाथों को तन से जुदा कर दिया गया
प्रत्येक मूर्ति के सिर को नहीं बख्शा गया
दिखती है घृणा तुम्हारी
बुद्ध की प्रतिमाओं से
फिर भी तुम अपनी संस्कृति को
सहिष्णु बताने में नहीं थकते।

दुनिया का सबसे ऊंचा
केसरिया का यह स्तूप
चीख चीख कर बता रहा है
इस हालत में किसने पहुंचाया इसे।

बुद्ध ने बिताये यहां मात्र एक दिन
अपने परिनिर्वाण से पहले
अशोक ने याद को जीवंत किया स्तूप में 
पर किसने इसे नेस्तनाबूत किया इसे?

तब कोई ना मुगल था
ना कोई तालिबान था
ना जनरल डायर था
फिर ऐसा क्यों हुआ होगा?
कैसे और किसने बता दिया इसे
राजा बेन का किला?

कितना भी कर लो कोशिश
बुद्ध को ढकने की
बुद्ध को छिपाने की
पर
बुद्ध हैं कि ढकते नहीं।

©संतोष पटेल
Santosh Patel 

[ जगातला सर्वात उंच बुद्धस्तूप म्हणून बिहार राज्यातला
वैशाली केसरिया सुप्रसिद्ध आहे.
अधिक माहिती पुढे ]

Stupa
Rising to a height of 104 feet, and much reduced than its reported original height, it is still one foot taller than the famous Borobodur Stupa In Java. The Stupa is located near the town of Kesaryla, 120 km from Patna, capital of Bihar. According to the National Informatics Centre of East Cham paran (Motihari) publication, the Kesariya Stupa was 123 feet tall before the 1934 earthquake in Bihar. Originally the Kesariya Stupa was reported to have been 150 feet tall, 12 feet taller than the Borobodur stupa, which is 138 feet, according to the A.S.I. report. At present Kesariya Stupa is 104 feet and Borobodur Stupa is 103 feet.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने