सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या

सत्यशोधकी ओव्या!
🚩
आता 'अभिजीत'ता बरळते
अध्यात्ममहत्व उगाळते
भटाळणुकीची पाळते
पथ्ये अनेक!

अध्यात्मात गोते खातो
विज्ञान पालथे घालतो
अ-शास्त्राची महती गातो
पंचांगखोर!

ब्रह्मवृंदापुढे सरपटे
धादांत बोलतो खोटे
काळाचे चाक उलटे
फिरवू पाहे!

वर्ण-अव्यवस्थेला गोंजारी
आहे मनुस्मृतीचा कैवारी
भटशाहीची गा जी हुजूरी
करतो फक्त!

पेठेमधले दीडशहाणे
भटाळले गा प-घराणे
सकाळचे हे घुबडगाणे
ऐकत राहू!

चमत्कार सत्य मानती
अंधश्रद्धेची री ओढती
संतविचारास मूठमाती
देत सुटती!

शेणभरल्या मेंदूमधले
किडे वळवळती सगळे
पादुकापुराणाचे चाळे
सुचती मग!

पुनरुज्जीवनाचा निर्धारु
सनातन्यांचा नवआधारु
शंकराचार्याचा अवतारु
प्रकटला जणू!

शोषणाचे अधिष्ठान गाठी
अजीत अभिजीतता मोठी
अशी प्रतापी औलाद करंटी
निपजली बा!

चालविती सत्संगाचे ठेले
शोभती  विश्वगुरुचे चेले
लपून होते ते उघड झाले
या षंढयुगी!
🚩
            -भरत यादव
      Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने