कुणब्याचे अभंग

कुणब्याचे अभंग

कुणब्याचे अभंग-१

पुन्हा पुन्हा देऊ
'चलो दिल्ली' नारा
कोण हा खट्टारा
अडवतो!

राजधानीमध्ये
येऊ नये आम्ही
कसे कोण तुम्ही
सांगणार?

गिधाडाची चाल
मोडूनिया काढू
नांगराने तोडू
अडथळे!

सत्तेचा गुलाम
मनोहर लाल
मोतीचा दलाल
शोभतसे!

-भरत यादव
Bharat Yadav 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने