कुणब्याचे अभंग- तीन

कुणब्याचे अभंग- तीन

कुणब्याचे अभंग-३

ड्रोनहल्ले करा
सोडा अश्रुधूर
माघार घेणार
नाही आता!

सीमेपल्याडून
शत्रू जणू कोण
करी आक्रमण
देशावर!

ड्रोन-बंदूकींना
पतंगांचा धाक
कोण घाली भीक
धमक्यांना!

आमचे जवान
आमच्यासमोर
बापापुढे पोर
उभे केले!

     -भरत यादव
Bharat Yadav

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने