आपण त्यांनाच सैनिक मानत राहिलो
जे राजाज्ञेने राजसत्तेसाठी लढले
ज्यांनी किल्ले वाचवले,महाल वाचवले
राज्ये वाचवली,राजसत्ता वाचवल्या
सैनिक तेही होते
जे लोकांसाठी राज्याशी लढले
किल्ले,महाल,सिंहासन वाचवण्याऐवजी ज्यांनी लोकांची घरे वाचविली,त्यांचे हक्क-अधिकार वाचवले,उद्गार वाचवले,
शेत-शिवार,व्यापार-उदीम वाचवला
त्यांची लढाई फक्त संघर्ष नव्हे तर युद्ध होते
युद्धे
केवळ सीमेवरच होत नसतात
देशाच्या आणि आपल्यातल्या
आपल्या अस्मितांसाठी सुद्धा ती
लढली जातात!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
सैनिक
हम उन्हें ही सैनिक मानते रहे
जो राजाज्ञा से राज्य के लिये लड़े
जिन्होंने किले बचाये , महल बचाये
राज्य बचाये , राजसत्ताएँ बचाईं
सैनिक वे भी थे
जो लोगों के लिये राज्य से लड़े
किले , महल , सिंहासन बचाने के बजाय
जिन्होंने लोगों के घर बचाये
उनके अधिकार बचाये , उद्गार बचाये
खेत खलिहान , व्यापार बचाये
उनकी लड़ाई सिर्फ संघर्ष भर नहीं युद्ध थी
युद्ध
केवल सीमा पर ही नहीं होते
देश के और अपने भीतर
अपनी अस्मिता के लिये भी लड़े जाते हैं !
©राजहंस सेठ
Rajhans Seth