कुणब्याचे अभंग- सहा

कुणब्याचे अभंग- सहा

कुणब्याचे अभंग-६

अश्रुधूर सोडा
किंवा गोळ्या झाडा
भले पांग फेडा
कुणब्यांचे!

कष्टकर्‍यांमध्ये
नको प्रांतभेद
देश हा सबंध
आपलाच!

सत्ताधारी चिंती
सत्तेचे गणित
शोषणाची रीत
सारखीच!

राजधानी झाली
राजाची बटीक
काळ हा खाटिक
बनलेला!
        -भरत यादव
  Bharat Yadav

Art- Anakh Samudur
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने