🚩
शिवरायांचा देव केला
हाती त्रिशूळ-शंख दिला
महामानव मंदिरात कोंडला
निर्लज्जपणे!
युगेनयुगे हे असेच घडलेले
बहूजन नायकास निवडलेले
आणि अवतारात घूसडलेले
नीचनीतीने!
देवत्व दिल्याने काय साधले?
तयांचे मनुष्यत्व मुळी संपले
आणि विचाराचे मुडदे पडले
आपसूकच!
हातजोड्या वृत्तीस बळ मिळे
टाळ कुटावयास होतो मोकळे
सारासार बुद्धीस ठोकून टाळे
वाचतो पोथी!
माणूसपण हिरावून घेती
छद्मपणाने देवत्व थोपती
मानवी पराक्रमास गणती
चमत्कारात!
वैदिकांचा हाच परिपाठ
आयते लाटायचे जे जे श्रेष्ठ
निगरगट्टपणे सांगायचे थेट
आपले म्हणून!
थोतांडनिर्मितीचा हा धंदा
अव्याहतपणे वाहतो रेंदा
बहूजन मना-मेंदूचा कांदा
नासवत आला!
मावळ्यांनो,ओळखा कावा
छत्रपतींचा देव न होऊ द्यावा
निखळ माणूस म्हणूनच हवा
शिवबा आम्हां!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav