आजकालचे अभंग

आजकालचे अभंग

आजकालचे अभंग!
🚩
स्तुतीपाठकांची
झाली भाऊगर्दी
साईंची समाधी
संकोचली!

सत्तेच्या चरणी
सेवा व्हावी रुजू
भाट आम्ही गर्जू
मंदिरात!

कलावंत झाले
दिल्लीपुढे लीन
काळ हा कठीण
होई सोपा!

म्हागुरुप्रमाणे
विग लपेटला
कंठही फुटला
पोपटास!

विवेकाशी नाही
काही देणेघेणे
बेताल बोलणे
तर्कशून्य!

विश्वगुरुसाठी
कंठाशी हे प्राण
मिळावा सन्मान
कुठलाही!

आदर्श राज्याची
झाली रे स्थापना
यावे पुन्हा पुन्हा
नमोराज्य!

गवयाने नको
भाटभक्त होणे
बेसूर ते गाणे
गाऊ नये!
🚩
      -भरत यादव
Bharat Yadav 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने