आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!
🚩
लग्नाआधीची चंगळचैन
संपत्तीचे हिडीस प्रदर्शन
अंबानीघरी जमले श्वान
हुकूमावरून!

सारी साधनसंपत्ती देशाची
एकाजागी जमवली साची
पुण्याई ती गुज्जरभूमीची
अवर्णनीय!

मोदी-अदानी-अंबानी युती
भारतासाठी फलदायी किती
युगानयुगाची पारतंत्र्यस्थिती
पालटली बा!

जल-जमीन-जंगल सगळे
उड्डाणपूल,महामार्ग,इमले
दोन घराण्यांच्या नावे केले
भर संसदेत!

व्यापार्‍यांहाती दिला कारभार
झाला मुजोर दिल्लीदरबार
श्रमिक-कास्तकरी निराधार
झाले की जी!
                    -भरत यादव
              Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने