🚩
सत्तेपुढे नाही
काका किंवा बाप
भावकीचा शाप
भोगताना!
पक्ष उभारीला
ना उपकार केले
पांग फेडलेले
पुतण्याने!
सत्तेसाठी करू
सत्याचाही खून
नमोगुणी मन
चेकाळले!
खुर्चीसाठी सुरु
लबाडीचा खेळ
लोकशाही छळ
सोसतसे!
लाज गुंडाळून
झाले बा नागडे
'बारा'गंडी कोडे
सुटेची ना!
महाराष्ट्री वाहे
फितुरीचे वारे
दिल्लीपती वा रे
तुझा न्याय!
देवेंद्राने छान
फोडले बा घर
आणि नागपूर
सुखावले!
🚩
-भरत यादव
Bharat Yadav