सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग

सत्यशोधकी अभंग!
🚩
प्रकटदिन म्हणे!
काय पाद्यपूजा
जरा तरी लाजा
बाळगा रे!

पिढ्यानपिढ्या
मेल्या गुलामीत
तरी चिखलात
फतकल!

मंदबुद्धी कुणी
कुणी वेडसर
मठ नि मंदिर
तुडूंबले!

वेड्यामागे वेडे
हजारो शहाणे
मुर्खवत जिणे
पराधीन

गांजकेस कुणी
फुंकतो चिलीम
श्रद्धेची जालीम
विषवल्ली!

भिऊ नका म्हणे
कुणी अजागळ
मुळातच बळ
नाही अंगी!

भटाबामणांनी
महत्ता वर्णावी
आम्ही हलवावी
मुंडी-मान

नसलेले देव
लादती नव्याने
बामणी काव्याने
सुरु खेळ!

कुठे फकिराचे
केले धर्मांतर
आणिक मंदिर
मशिदीचे!

श्रद्धा-सबुरीला
पोटार्थ्यांची लाथ
सेवेमध्ये अर्थ
दडलेला!

कालबाह्य झाला
आता यज्ञकाळ
म्हणून देऊळ
उभारिती!

अगा वैदिकांनी
आवळला फास
बहूजन-श्वास
कोंडलेला!
🚩
       -भरत यादव
 Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने