सत्यशोधकी ओव्या!

सत्यशोधकी ओव्या!

सत्यशोधकी ओव्या!
🚩
भ्रष्टाचाराचा नवनूतन प्रकारु
विषगुरुचा हा विराट अवतारु
महाघोटाळ्याचा धूर्त सूत्रधारू,
ओळखावा!

विकासाच्या नावाखाली लूटले
जल-जमीन-जंगल कुठले कुठले
अगा आदिवासींचे काळीज फाटले,
अत्याचाराने!

राष्ट्रभक्तीची अजब तर्‍हा कसली
पक्षाकरिता देशनिष्ठाच विकली
ईस्टइंडिया कंपनीची मान झुकली,
शरमेने!

धनदांडग्यांच्या कल्याणासाठी
जनतेवर चालवली शोषणकाठी
राबविली यंत्रणा कितीतरी मोठी,
क्रूरपणे!

जमवला धनिक गोतावळा
मटकावला रोख्यांचा गोळा
लोकशाहीचाच चिरला गळा,
वैर्‍यांनी या!
🚩 
                       -भरत यादव
                 Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने