प्रत्येकजण हसत असतो
आपल्या आपल्या अर्थासह
मूल हसते,
तर वाटते,ते निर्भय आहे.
प्रेयसी हसते,
तर वाटते,तिला मान्य आहे
माझा प्रस्ताव.
विचारवंत हसतात,
तर वाटते,
टोमणा मारताहेत जगाला.
भुकेलेला हसतो,
तर वाटते,तो मुक्त झालाय आणि प्राप्त
करण्यासाठी पडलेय त्याच्यापुढे अख्खे जग.
जेव्हा श्रीमंत हसतो,
तेव्हा वाटते, सत्ताधारीच हसतोय
जणू देशाची दुखरी नस त्याच्या हातात आहे आणि
जेव्हा जेव्हा त्याला मजा घ्यावीशी वाटेल,
तेव्हा तेव्हा तो
ती जराशी दाबेल.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
मुस्कुराहटें
हर कोई मुस्कुराता है
अपने अपने अर्थ के साथ।
बच्चा मुस्कुराता है,
तो लगता है, वह निर्भय है।
प्रेमिका मुस्कुराती है,
तो लगता है, उसे स्वीकार है मेरा प्रस्ताव।
दार्शनिक मुस्कुराता है,
तो लगता है, व्यंग्य कर रहा है दुनिया पर।
भूखा मुस्कुराता है,
तो लगता है, वह मुक्त हो चुका है और पाने को पड़ी है
उसके सामने पूरी दुनिया।
जब अमीर मुस्कुराता है,
तो लगता है, शासक मुस्कुरा रहा है,
कि देश की कमज़ोर नब्ज़ उसके हाथ में है,
कि जब भी उसे मज़ा लेना होगा,
दबा देगा थोड़ा सा।
©फरिद खान
Farid फ़रीद Khan ख़ाँ