काॅमन मॅन
आर.के.लक्ष्मण यांचा
सामान्य माणूस
सध्या
अयोध्यामंदिराजवळील
कुठल्याशा खड्ड्यात
घोटाळे दफन होताना
बघू शकत आहे?
किंवा
तो पाहू शकत असेल का
लोकांचे आपल्या मोबाईलमध्ये
मणीपूरात स्त्रियांना नग्न फिरवले जात असल्याच्या व्हिडिओला
पाहू शकणे
चहासोबत समोसा खात खात?
काय तो बघू शकतोय?
रिकाम्या सिलेंडरला ड्रमसारखे वाजवले जाणे,बॅंडबाजातील
एखाद्या वाद्यासारखे
लग्नातल्या वरातीप्रमाणे?
काय तो बघू शकतो आहे?
लोकांचे पाहाणे
आरशात स्वतःला
ते उंदीर
बनताना
जे पाईडपायपरची धून ऐकत-ऐकत
खोल दरीच्या दिशेने चालतच
चालल्याचे?
काय तो गायब आहे?
कि त्याचा मृत्यू झालाय?
आजकाल दिसत नाही कुठे
वर्तमानपत्राच्या दर्शनी पानावरच्या
कोपर्यात
फाटका खिसा आणि फाटलेल्या
बुटांचा 'आर.के.लक्ष्मण यांचा
सामान्य माणूस'
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
आर के लक्ष्मण का आम आदमी
क्या वो
अयोध्या मंदिर के पास
किसी गढ्ढे में
घोटालों को दफन होते हुए देख पा रहा है?
या वो देख पा रहा है क्या
लोगों का अपने मोबाइल में
मणिपुर में औरतों को नंगा घुमाया जाने वाली विडियो को
देख पाना
चाय के साथ समोसा खाते हुए?
क्या वो देख पा रहा है
खाली गैस सिलेंडर को ड्रम की तरह बजाये जाना
बैंड के हिस्से की तरह
शादियों के मौसम में?
क्या वो देख पा रहा है
लोगों का देख पाना
आईने में खुद को बनते हुए
वो चूहा
जो पाईडपाईपर की धुन सुनते हुए
खाई की तरफ बढ़ते ही जा रहा है?
क्या वो गुमशुदा है?
या उसकी मौत हो गयी है?
आजकल दिखता नहीं कहीं
अखबार के सामने वाले पन्ने के कोने में
फटी जेब और टूटे हुए जूतों वाला
"आर के लक्ष्मण का
आम आदमी"
©ऋतु डिमरी नौटियाल
Ritu Dimri Nautiyal