आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या

आजकालच्या ओव्या!

सद्गुरुभक्तीचा पाहा चमत्कार
म्हणे,सूर्य उगवायचा थांबणार!
पृथ्वी जागच्याजागी थबकणार,
उदईक!

अध्यात्मशक्तीच्या मारल्या बाता
आयुष्यभर गंडवलेले अंधभक्ता
तयांना कळली विज्ञानमहत्ता,
अखेरीस!

भोंदूंच्या ऐशा वल्गना पोकळ
तरी लोकांना येईना अक्कल
भ्रमसापळ्यात त्या खोल खोल,
अडकती!

मुर्खांचा बाजार तुडूंबला आता
थोतांडशरण बनली गा जनता
मायबापाहून थोर मानता-मानता
बलात्कारी!

मेंदूत शेण भरलेले ठासून
विवेकबुद्धी गेलीसे नासून
भक्तीरसाचे बोधामृत प्राशून,
होती मठ्ठ!
                     -भरत यादव
               Bharat Yadav 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने