प्रगतीशील आचरण

प्रगतीशील आचरण

प्रगतीशील आचरण

जेव्हा मी त्याला म्हटले-
'तू फॅसिस्टांच्या शेजारी राहातोस.'
तर तो म्हणाला, 
'आमच्या गल्ल्या वेगळ्या आहेत.'

जेव्हा मी त्याला म्हटले-
'तू फॅसिस्टांमध्ये काम करतोयस'
तर तो म्हणाला, 
'आमची कामं वेगळी आहेत'

जेव्हा मी त्याला म्हणालो-
'तू फॅसिस्टांच्या कार्यक्रमांना जातोस'
तर तो म्हणाला,
'आम्ही आमचे मत मांडतो'

जेव्हा मी त्याला म्हटले-
'तू फॅसिस्टांसोबत कविता वाचतोस'
तो म्हणाला, 
'आमची सत्रं वेगळी असतात'

जेव्हा मी त्याला म्हटले-
तू फॅसिस्टांसोबत,फॅसिस्टांमध्ये
फॅसिस्टांच्या मंचावर कविता वाचतोस
तर तो म्हणाला,
'भाऊ काय मागे लागलायस,
आमच्या आणि त्यांच्या खुर्च्या तर
वेगवेगळ्या आहेत.'

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

प्रगतिशील आचरण

जब मैंने उससे कहा-
तुम फ़ाशिस्टों के पड़ोस में रहते हो
तो उसने कहा हमारे मुहल्ले अलग हैं

जब मैंने उससे कहा-
तुम फ़ाशिस्टों के बीच काम करते हो
तो उसने कहा हमारे काम अलग हैं

जब मैंने उससे कहा-
तुम फ़ाशिस्टों के कार्यक्रमों में जाते हो 
तो उसने कहा हम अपनी बात कहते हैं

जब मैंने उससे कहा-
तुम फ़ाशिस्टों के साथ कविता पढ़ते हो
उसने कहा हमारे सत्र अलग हैं

जब मैंने उससे कहा-
तुम फ़ाशिस्टों के साथ, फ़ाशिस्टों के बीच
फ़ाशिस्टों के मंच पर कविता पढ़ते हो
तो उसने कहा भाई जी क्यों पीछे पड़े हैं
हमारी और उनकी कुर्सियाँ तो अलग हैं।

©अदनान कफिल दरवेश
Adnan Kafeel Darwesh 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने