काही लघुकथा
१.
जज- किती मेले?
वकील- ४ माय लाॅर्ड
जज- पण आकडा तर शंभरचा आहे
वकील- ९६..'ते' होते माय लाॅर्ड!
जज- हे कोर्ट या चार मृतांच्या कुटुंबियांना मदत,भरपाई आणि
दंगल भडकवणार्या ९६ दंगलखोरांच्या कुटुंबांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देत आहे.
२.
वकील- माय लाॅर्ड! आम्हाला आणखी थोडा वेळ हवाय.
जज- पुरावे गोळा करायला?
वकील- नाही...नष्ट करायला!
३.
फिर्यादी- हे कोण आहेत?
वकील-नवे जज!
फिर्यादी- मागच्यावेळेस होते त्यांचे काय झाले?
वकील-त्यांचा लोया झाला.
फिर्यादी-मग आता हे निकाल देणार?
वकील- नाही....पुढचे जज येईपर्यंतची तारीख.
४.
( ५० वर्षे जुनी केस )
जज- केस काय आहे?
वकील- खून...बलात्कार..दंगली...
जज- आरोपीला बोलवा
वकील-नेत्यांचे तर काल हृदयविकारामुळे निधन झाले
माय लाॅर्ड...आज त्यांच्या पार्थिवावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मुकदमा : लघुकथाएं
1)
जज - कितने मरे ?
वकील - 4 माय लॉर्ड
जज - पर आंकड़ा तो सौ का है
वकील - 96 .. ' वो ' थे माय लॉर्ड !
जज - कोर्ट इन 4 मरने वालों के परिवारों को मुआवजा और दंगा भड़काने वाले 96 दंगाइयों के परिवार की संपत्ति राजसात करने का हुक्म सुनाती है ।
2 )
वकील - माय लॉर्ड ! हमें थोड़ा और वक्त चाहिए ।
जज - सबूत जुटाने को ?
वकील - नहीं .. मिटाने को ।
3)
फरियादी - ये कौन हैं ?
वकील - नए जज !
फरियादी - पिछले साहब का क्या हुआ ?
वकील - उनका लोया हो गया ।
फरियादी - तो अब ये फैसला देंगे ?
वकील - नहीं .. अगले जज के आने तक तारीख ।
4)
( 50 साल पुराना केस )
जज - केस क्या है ?
वकील - मर्डर .. बलात्कार .. दंगे ..
जज - आरोपी को बुलाइए
वकील - नेताजी का तो कल ह्यदयघात से स्वर्गवास हो गया माय लॉर्ड .. आज उनकी राजकीय सम्मान सहित
अंत्येष्ठि है ।
मूळ हिंदी लघुकथा
©मोहन कुमार नागर
Dr.Mohankumar Nagar