जमिनीशी जोडला गेलेला माणूस
कायम जमिनीतच पडून राहणार नाही
तो उठेल
एक दिवस तुझ्या नरडीचे माप घेईल
तुझ्या बुटांच्या खालून जमीन खेचून घेईल,
बनवेल तिथे शेत अथवा घर
आज तळवे चाटणारे लोकसुद्धा
उद्या उभे राहातील विरोधात
तेव्हा कुठला पर्याय असेल तुझ्यापाशी,
सुरक्षित आत्महत्येसाठीचा
बंकर बनविण्यासाठीची जमीन
तू आत्तापासूनच शोधली पाहिजे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
नये तानाशाह से
जमीन से जुड़ा आदमी
हमेशा जमीन पर नहीं पड़ा रहेगा
वह उठेगा
एक दिन तुम्हारी गर्दन नाप लेगा
तुम्हारे बूटों के नीचे से जमीन खींच लेगा
बना लेगा वहां खेत या घर
आज तलुवों पर पड़े लोग भी
कल खड़े होंगे ही विरोध में
तब क्या विकल्प होगा तुम्हारे पास
सुरक्षित आत्महत्या के लिये
बंकर बनाने की जमीन
तुम्हे अभी से खोज लेनी चाहिए । **
©राजहंस सेठ
Rajhans Seth