आकांक्षा

आकांक्षा

आकांक्षा

सूर्य सांगतो आहे
जेव्हा पृथ्वी माझ्यापासून तोंड फिरवायला लागेल
तुम्ही मला आठवा
माझ्याबद्दल बोला
प्रकाशाबद्दल बोला,
जेव्हा सगळीकडे अंधार असेल

जेव्हा तोडले जात असतील हात आणि पाय
बरोब्बर त्याचवेळी
पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागा
कारण फांद्या आणि 
बुंध्याचे कापले जाणे म्हणजे
झाडाचा मृत्यू असत नाही

आणि जेव्हा बोलण्याची मनाई असेल
बरोब्बर त्याच वेळी
गुणगुणावे
काही स्वरांना,
तिथे शब्दांची गरज नाही

गर्दीसाठी आवश्यक आहे
बस्स तुम्ही एकट्याने चालायला लागणे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

उम्मीद

सूरज कहता है 
जब पृथ्वी मुझसे मुँह मोड़ रही हो 
तुम मुझे याद करना
मेरी बात करना
बात करना रौशनी की 
जब हर तरफ़ अंधेरा हो

जब काटे जा रहे हों हाथ और पैर
ठीक उसी वक्त
जुट जाना अगले सफ़र की तैयारी पर
कि टहनियों और तने का कट जाना 
पेड़ की मृत्यु नहीं होती 

और जब बोलने की मनाही हो
ठीक उसी वक्त
गुनगुनाओ
कुछ धुनों को शब्दों की ज़रूरत नहीं

भीड़ के लिए ज़रूरी है
बस तुम्हारा अकेले चल पड़ना।

©शेफ़ाली शर्मा
Shefali Sharma 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने